Navapur civic election Congress announces Dr. Deepak Jaiswal as candidate for mayoral post: Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Navapur News : हक्काचा गड राखण्यासाठी काँग्रेस आमदार सज्ज : नगराध्यक्षपदासाठी थेट प्राचार्यांनाच केले उमेदवार

Navapur civic election Congress announces Dr. Deepak Jaiswal as candidate for mayor post: राज्यात जरी काँग्रेस पक्षाची सत्ता नसली तरी मात्र नवापूर शहरासह तालुक्यात काँग्रेस पक्ष आजही माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली मजबूत पाय रोवून खंबीर पणे उभा आहे.

सरकारनामा ब्यूरो

सागर निकवाडे

Nandhurbar News: नवापूर नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. विविध राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या नवापूर पालिकेच्या निवडणुकीत पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी प्राचार्य डॉ. दीपक जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. या चर्चेना पूर्णविराम दिला आहे.

इच्छुक नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या मुलाखती नवापूर तालुका कॉंग्रेस भवन येथे झाल्या. नगराध्यक्ष पदासाठी इच्छूक उमेदवारांपैकी प्राचार्य डॉ. दीपक जयस्वाल यांच्या नावाची पक्षाकडून घोषणा करण्यात आली. नगरसेवकपदासाठी इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. लवकरच काँग्रेस पक्ष आपली यादी जाहीर करणार आहे.

नवापूर पालिकेवर बहुतांश काँग्रेस पक्षाची सत्ता राहिली आहे. उत्तर महाराष्ट्रात नवापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला अबाधित राहिला आहे. राज्यात जरी काँग्रेस पक्षाची सत्ता नसली तरी मात्र नवापूर शहरासह तालुक्यात काँग्रेस पक्ष आजही माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली मजबूत पाय रोवून खंबीर पणे उभा आहे.

आमदार शिरीषकुमार नाईक पालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता कशी स्थापन होईल, या अनुषंगाने रणनीती आखत आहेत. त्यांच्या राजकीय अनुभव पाहता, त्यांच्या मनातील राजकीय पेच सहसा कोणाच्या लक्षात येत नाहीत. त्यांची राजकीय खेळी पाहता उमेदवारी देताना सर्व बाजूनी विचार विनिमय करून, भविष्याचा वेध घेऊन नेमका उमेदवार निवडतात.

उमेदवारांशी सविस्तर चर्चा करून आगामी निवडणुकीसाठी पक्षाची तयारी व धोर‌णात्मक दिशा निश्चित करतात. काँग्रेस पक्षाची नगरपालिकेतील उमेदवार यादी लवकरच जाहीर होईल. पक्षांतर्गत चर्चांना आता गती मिळाली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT