Nawab Malik
Nawab Malik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नवाब मलिक म्हणाले, ममता बॅनर्जी नव्हे, सध्याच्या राजकीय स्थितीवर होणार चर्चा!

Sampat Devgire

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या (ता.७) नवी दिल्लीत होत आहे. या बैठकीत ममता बॅनर्जी यांचा नुकताच झालेला दौरा किंवा युपीए या विषयावर चर्चा अपेक्षित नाही. या बैठकीत देशातील सद्य राजकीय स्थितीवर विचार विमर्ष होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांनी दिली.

ते म्हणाले, उद्या (ता.७) नवी दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दुपारी ३.३० वाजता दिल्ली येथील राष्ट्रवादी कार्यालयात होईल.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून या बैठकीत पक्षातंर्गत होणार्‍या निवडणूका कार्यक्रम आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, विशेष निमंत्रित आणि कार्यकारिणी सदस्य जे मंत्री आहेत त्यांना पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीत युपीए किंवा ममता बॅनर्जी हा मुद्दा नसून फक्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT