Agitation in Malegaon city
Agitation in Malegaon city Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chandrakant Patil; मालेगावी पाटील यांच्या विरोधात संघटना एकवटल्या

Sampat Devgire

मालेगाव : भाजपचे (BJP) नेते व पदाधिकारी हे जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील (Maharashtra) महापुरुषांचा वारंवार अपमान करीत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एका कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील, (Karmveer Bhaurao Patil) महात्मा ज्योतिबा फुले, (Mahatma Phule) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी भिक मागून शाळा काढल्या, असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतानाच येथील पक्ष संघटनांतर्फे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध करण्यात आला. (Agaitaion against BJP & Chandrakant Patil in Malegaon City)

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजित भोसले यांच्या नेतृत्वात शनिवारी महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन, तसेच, आत्मक्लेष आंदोलन केल्यानंतर आंदोलकांनी शहर पोलिस ठाणे गाठले. या आंदोलनात शहरातील विविध संघटना देखील सहभागी झाल्या. कार्यकर्त्यांनी घोषणा देत निषेध केला.

गेल्या काही दिवसांत शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळातील विशेषतः भाजपचे नेते, मंत्री, पदाधिकारी जाणीवपूर्वक राज्यातील महापुरुषांचा वारंवार अपमान करीत आहेत. तसेच, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात भर घालत मंत्री पाटील यांनी तिघा महापुरुषांबाबत अवमानजनक विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शहराचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

आंदोलक श्री. भोसले, गोरख शर्मा, मंगेश जगताप, भिका नेरकर, उमेश महाले, रईस काझी, रईस शेख, राजेंद्र सोलंकी, महेंद्र शिरसाट, राजेंद्र चौधरी, दीपक देवरे, सोनू घारू, दत्तू पाटील, संदीप पाटील, अमीन शेख, एजाज शेख, वाल्मीक मराठे, सरोज कदम, संगीता खैरनार, वंदना केदार, शारदा भामरे, वनिता गरुड, वर्षा सूर्यवंशी, कविता खेडकर, विमलबाई सोनवणे, स्वामिनी पारखे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT