Sharad Pawar-Uddhav Thackeray
Sharad Pawar-Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मूड महाराष्ट्राचा : नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ‘ॲडव्हांटेज’

सरकारनामा ब्युरो

नाशिक : महाविकास आघाडीला सत्तेत येऊन दोन वर्षे झाली आहेत. आज जर निवडणूका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल 'सकाळ-साम'ने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे. यात नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला ‘ॲडव्हांटेज’मिळण्याचा अंदाज आहे.

सकाळ-सामच्या सर्वेक्षणानुसार आज निवडणूक झाल्यास नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या आमदारांची असलेली ६ ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ती ९ पर्यंत वाढू शकते. तर भाजप आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याचा अंदाज आहे. शिवसेनेलाही आज निवडणूका झाल्यास नाशिकमध्ये फायद्याचे गणित ठरु शकणार आहेत. शिवसेनेचे नाशिक शहरात संख्याबळ वाढण्याची चिन्हे आहेत.

राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीविरुद्ध काही मुद्दे मतदारांच्या मनामध्ये असले, तरीही ते निवडणुकीच्या मैदानात स्पष्टपणे दिसून येणार नाहीत, अशी सध्याची स्थिती असल्याचा हा सर्वे सांगत आहे. काँग्रेसचे महत्त्व इगतपुरी तालुक्यात आहे. तिथे ते टिकून राहण्याची शक्यता असून, चांदवडमध्ये काँग्रेसला बळ मिळाल्यास पक्षाला फायदा होऊ शकतो. नाशिक शहर वगळता जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग सफल होण्याची शक्यता आहे. लहान पक्षांचा विचार करता ‘एमआयएम’ला मालेगाव शहरात यावेळी धक्का बसू शकतो, अशी स्थिती या सर्वेनुसार दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT