ओझर : गेल्या वर्षभरापासून वाढत असलेल्या अवैध धंद्याबाबत (illigal trades) स्थानिक पोलिसांनी (Local Police) दुर्लक्ष केल्याने त्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे (CM) तक्रार करण्यात आली आहे. सत्तादारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच तक्रार केल्याने याबाबत पोलिस यंत्रणा देखील सावध झाली. आता याबाबत कोणावर कारवाईचा बडगा उगारला जातो याची उत्सुकता आहे.
या मागण्यांचा विचार करुन त्यावर कारवाई न झाल्यास ओझर शहरात आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. शहर व परिसरात ऑनलाईन रोलेट बिंगो व त्यांचे क्लब, अवैद्य दारू तसेच गुटखा विक्री याचबरोबर इतर अवैध खेळांमुळे परिसरात गेल्या वर्षभरात अनेक आत्महत्या झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु याकडे डोळेझाक करत पोलिस प्रशासन कोणतीही खबरदारी व या धंद्याकडे लक्ष देत नसल्याने अनेक कुटुंब देशोधडीला लागले आहे.
पोलिसांनी कारवाई करून जुगारी खेळ बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु आता मोबाईल ॲपद्वारे हा खेळ सुरू आहे. यावर सायबर क्राईमने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. गुटखा विक्रीस बंदी असतानाही अर्थपूर्ण संबंधांमुळे त्यांची सर्वत्र खुलेआम विक्री सुरू आहे. वाढत्या अवैद्य धंद्याकडे मात्र कानाडोळा केला जात असल्याने ओझर शहरासह पिंपळगाव, पिरवाडी, सायखेडा आदी ठिकाणी अवैध धंद्यांचे जाळे पसरलेले आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील याकडे लक्ष देणार का असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत. या प्रश्नांकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने वरिष्ठ स्तरावरून यावर तात्काळ कारवाई करावी या प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी युवक कांग्रेस शहराध्यक्ष विशाल भडके, संदीप अक्कर, कृष्णा शेजवळ, अमित धारराव, भावेश मंडलिक,अतुल नवगिरे, अक्षय गांगुर्डे, आदित्य पगार सुहास शिंomplain दे अतिश शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्रालय, अप्पर पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.