Ajit Pawar, Raj Thackeray
Ajit Pawar, Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज्यात कोणाचीही हुकूमशाही चालणार नाही; अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा

सरकारनामा ब्यूरो

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर काल (१ मे) औरंगाबादमधील सभेत पुन्हा एकदा हल्लाबोल केला. शरद पवार यांच्यासाठी खास काही वेगळे संदर्भ आणले आहेत, असे म्हणत राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांची यादीच वाचून दाखवली. तसेच पवार यांनी आपल्याला हवं तेवढंच न वाचता हे सर्व वाचावं, असा टोला देखील लगावला. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पवार यांना नास्तिक म्हटल्यानं त्यांना बोचलं असे म्हणत सुप्रिया सुळेंचा (Supriya Sule) संदर्भ दिला होता. यावर आज (ता.2 मे ) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

पवार म्हणाले, राज ठाकरेंनी काल पूर्वीचंच भाषण रिपीट केलं आहे. भोंग्याबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाहीय. राज्य घटना, कायदे, नियम सर्वांना सारखे आहेत. त्यामुळं घरी बसून आणि सभेत बोलायला काय जातं? कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस कारवाई करतील, असा थेट इशाराही अजित पवारांनी राज यांना दिला.

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं काम महात्मा फुलेंनी केलं आहे. त्यामुळे इतिहास नीट अभ्यासला जावा, असा सल्लाही त्यांनी राज यांना दिला. राज यांनी उन्हाचा तडाखा, भारनियमन, महागाई, कोळशाचा तुटवडा या प्रश्नांबद्दल बोलावं, असा टोलीही त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

शरद पवारांना काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे म्हणाले, 'शरद पवार सांगतात आम्ही दोन समाजात दुही माजवत आहोत. हे देशासाठी, राज्यासाठी चांगलं नाही. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत, त्याने दुही माजत आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतून पाहायची. हातात पुस्तक घेतल्यानंतर आधी लेखक पाहायचा. शरद पवार नास्तिक आहे असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग, त्यांचे मंदिरांमधील फोटो यायला लागले.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT