Chhagan Bhujbal ON Nar Par Girna Interlinking Project Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ आता गुजरातचे पाणी वळवणार?

Sampat Devgire

Nashik News: पाणीटंचाई हा येवलेकरांच्या नित्याचाच प्रश्न, हा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच मंजुरी दिलेली नार-पार गोदावरी उपसा जोड योजना नाशिक जिल्ह्याला वरदान ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतल्यामुळे ही योजना आली, असा दावा भुजबळ यांच्या समर्थकांनी केला आहे. भुजबळ यांचे येवला मतदारसंघात उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी ढोल ताशा गजर केला. भुजबळ यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

"आगामी काळातही पाण्यासाठीचे प्रयत्न सुरूच राहील. नार-पार गोदावरी उपसा जोड योजना क्रमांक ३ आणि ४ च्या माध्यमातून पार खोऱ्यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे ५ टीएमसी पाणी वळविण्यासाठी प्रयत्न करू, असे भुजबळ यांनी सांगितले.

गुजरातकडे जाणारे हे पाणी ५०० मीटर उंचीपर्यंतच्या लेव्हलवर आहे. त्यामुळे त्यासाठी खास प्रयत्न करावे लागतील, असे ते म्हणाले.मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे डोंगरगाव साठवण तलावात प्रवाहीत झाले. या पाण्यामुळे तीन पिढ्यांचे स्वप्न साकार झाले आहे.

कालवा बांधण्याचा कामाचा पाठपुरावा करून हे पाणी येवल्यात वळविले. त्यामुळे त्याला भुजबळ कालवा असे नाव द्यावे, अशी मागणी भुजबळ समर्थक कार्यकर्ते डॉ. मोहन शेलार यांनी केली.

येवला येथून डोंगरगावला जाताना ढोल ताशा डीजे वाजवत आणि फुलांची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करीत भुजबळांचे जल्लोषात स्वागत झाले. नागडे, धामणगाव, सायगाव फाटा, पांजरवाडी, गारखेडा, कौटखेडा, तळवाडे येथे स्वागत झाले.

भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. नांदूर मधमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवळे, उप अभियंता रितेश जाधव यांनी श्री भुजबळ यांचा सत्कार केला. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मायावती पगारे, बाजार समितीचे सभापती सविता पवार, लक्ष्मण कदम, अंबादास बनकर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT