NCP Workerss join Shinde Group
NCP Workerss join Shinde Group Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राष्ट्रवादीला झटका, नेत्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश!

Sampat Devgire

भडगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील (Swapnil Patil) यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत दोनशे कार्यकर्त्यांसह ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Eknath Shinde group) पक्षात प्रवेश केला. आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांच्या उपस्थिती त्यांचा प्रवेश झाला. स्वप्नील पाटील यांच्या शिवसेना (Shivsena) प्रवेशाने भडगाव तालुक्यासह विशेषत: आमडदे गणात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. (MLA Kishor patil`sefforts success for party expansion)

वाक ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आमदार किशोर पाटील यांशी चर्चा करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शुक्रवारी रात्री पाचोरा येथील शिवेसेना कार्यालयात वाक व वलवाडी येथील दोनशे कार्यकर्त्यांसह आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यात राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांसह वलवाडी ग्रामपंचायतीचे सदस्यांनी प्रवेश केला.

यावेळी स्वप्नील पाटील यांनी सांगितले, की तालुक्याच्या विकासासाठी मी शिवसेनेत प्रवेश करतो आहे. आगामी काळात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यावर आपला जोर असणार आहे. आमदार किशोर पाटील हे जी पण जबाबदारी देतील, ती सक्षमपणे पेलू, असा विश्वास व्यक्त केला.

आमदार किशोर पाटील म्हणाले, की स्वप्नील पाटील यांनी विकासाची जी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यापैकी काही कामे मंजूर आहेत. तर काही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आगामी काळात निश्चितपणे तालुक्याचा चेहरामोहरा बदल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या प्रवेशाने निश्चितपणे शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख संजय पाटील, शहरप्रमुख अजय चौधरी, वडध्याचे युवराज पाटील, युवासेनेचे तालुकाप्रमुख पुरुषोत्तम महाजन, युवा कार्यकर्ते महेंद्र ततार, नीलेश पाटील, पाचोरा तालुकाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, प्रवीण ब्राह्मणे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT