Rohit Pawar at Farm of Onion growers
Rohit Pawar at Farm of Onion growers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar News; रोहित पवार धावले कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला!

Sampat Devgire

नैताळे : केंद्र (Centre) व राज्यातील सरकारतर्फे (Maharashtra) नाफेडने शेतकऱ्यांकडे (Farmers) असलेला सर्व कांदा खरेदी करून तो इतर देशात विकावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली. ते नैताळे (Niphad) येथील शेतकरी सुनील बोरगुडे (Sunil Borade) यांच्या कांदा शेतीला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. (Rohit Pawer deemands Centre should buy Onion through NAFED)

येत्या दोन-तीन दिवसांत कांदा, द्राक्ष व कापूस यासंबंधीचे सर्व प्रश्न शरद पवार, अजित पवार यांच्यापर्यंत नेमकेपणाने पोचवेल व त्यासंबंधी चर्चा करेल, असे आश्वासनही आमदार पवार यांनी दिले.

सुनील बोरगुडे यांनी आपल्या दोन एकर कांद्याच्या शेतावर रोटर फिरविला. याबाबतचे वृत्ते समजल्यानंतर व्यथित झालेल्या पवारांनी आज नाशिकमधील कार्यक्रम आटोपून थेट निफाडचा रस्ता धरत बांधावर पोचले.

त्यांनी कांदा उत्पादकांची भेट घेत त्यांना धीर दिला. कांद्यासंदर्भातील त्यांच्या सर्व व्यथा जाणून घेतल्या. ते म्हणाले, ‘कांदा उत्पादकांचा उत्पादनखर्च बघितला तर सध्याचा बाजारभाव न परवडणारा आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. राज्यकर्ते कसबा व पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीत गुंतले असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळच नाही. असले सरकार काय उपयोगाचे, हे सरकार कांदा उत्पादकांऐवजी खाणाऱ्यांचा विचार करीत आहे.

याप्रसंगी अनेक द्राक्षउत्पादक शेतकरीही उपस्थित असल्याने त्यांनीही द्राक्ष निर्यातीसंदर्भाच्या समस्या आमदार पवारांना सांगितल्या. द्राक्ष निर्यातीवर होणारा खर्च वाढल्याने व्यापारी कमी दराने द्राक्ष खरेदी करत आहेत, यासाठी सरकारने लक्ष दिले पाहिजे.

शेतकऱ्यांनी रासायनिक खते, औषधे यांचे वाढलेले बाजारभाव अन् भांडवलीखर्चाचा हिशोब मांडला. आमदार पवार यांनी सर्व शेतकऱ्यांच्या समस्या व व्यथा जाणून घेतल्या व येत्या दोन-तीन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस त्याबाबत ठोस भूमिका घेणार असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘दादा व भुजबळसाहेब यावर सरकारला जाब विचारतील’, असेही त्यानी शेवटी सांगितले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, नवनाथ बोरगुडे, राजेंद्र बोरगुडे, शिवाजी बोरगुडे, दत्तात्रेय भवर, किशोर बोरगुडे, सोपान बोरगुडे, भूषण शिंदे, लहानू पाटील बोरगुडे, ॲड. प्रवीण ठाकरे, रत्नाकर दरेकर, बंटी शिंदे, सचिन जाधव, राहुल सानप, देवीदास बोरगुडे, राहुल बोरगुडे, रतन बोरगुडे, शरद घायाळ, गणपतराव कांडेकर, दिलीप पवार, नितीन बोरगुडे, योगेश बोरगुडे आदी शेतकरी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT