Yatindra Pagar, NCP leader Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

दीपिका चव्हाण यांच्याविषयी राष्ट्रवादीच्या नेत्याची ५१ मिनीटे शिवीगाळ!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि. प. सदस्या विरोधात माजी आमदार संजय चव्हाण यांची पोलिसांत तक्रार.

Sampat Devgire

सटाणा : राज्य महिला आयोगाच्या सदस्या, (State women commission) माजी आमदार दीपिका चव्हाण (Ex MLA deepika Chavan) व त्यांचे पती माजी आमदार संजय चव्हाण (Ex MLA Sanjay Chavan) यांना मोबाईलवरून अश्‍लिल शिवीगाळ व दमबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हा परिषद सदस्य यतींद्र पगार (Yatindra Pagar) यांनी प्रकार केला. त्याची ऑडियो क्लीप व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली. त्यामुळे बागलाणच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऑडियो क्लीपचा अध्याय सुरु झाला आहे.

यासंदर्भात तब्बल ५१ मिनिटे अवमानजनक व अर्वाच्य शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी यतींद्र प्रभाकर पगार यांच्याविरुद्ध माजी आमदार संजय चव्हाण यांनी सटाणा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

माजी आमदार संजय चव्हाण यांनी रविवारी सटाणा पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ४ एप्रिल २०२२ रोजी मोराणे सांडस (ता. बागलाण) येथील बाळासाहेब भदाणे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. चव्हाण भेटीसाठी गेले होते. त्यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीविषयी चर्चा झाली.

नामपूर जिल्हा परिषद गटातील वातावरण यंदा यतीन पाटील यांना अनुकुल नसल्याने त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल, अशी उघड चर्चा झाली. यानंतर ८ एप्रिल २०२२ रोजी श्री. चव्हाण कऱ्‍हे येथील त्यांचे मित्र सटाणा बाजार समितीचे माजी सभापती संजय वाघ यांच्याकडे गेले होते. त्यावेळी यतीन पगार यांच्याविषयी चर्चा झाली असता यतीन पगार यांनी संजय वाघ यांना गेल्या ४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास भ्रमणध्वनीवर सुमारे ५५ मिनिटे चर्चा करीत संजय चव्हाण यांच्याविषयी प्रचंड अश्‍लिल शिवीगाळ केल्याचे संभाषण श्री. वाघ यांनी रेकॉर्डींग करून घेतले.

ती ऑडियो क्लिप संजय चव्हाण यांना मिळाली. या क्लिपमध्ये चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार दीपिका चव्हाण, आई दिवंगत सुलोचना चव्हाण यांनाही श्री. पगार यांनी शिवीगाळ केली आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा उल्लेख माजी आमदार संजय चव्हाण यांनी तक्रारीत केला आहे. यामुळे माजी जि. प. सभापती यतीन पगार यांच्याविरूद्ध या प्रकरणी सटाणा पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार तपास करीत आहे.

या प्रकारामुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. आपल्याच पक्षातील कार्यकर्त्याने व्यक्तिद्वेशातून वारेमाप आरोप करून माझी व कुटुंबाची बदनामी केली. कायदेशीर सल्ला व वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आपण पोलिसाना सर्व पुरावे व तक्रार दिली आहे.

- संजय चव्हाण, माजी आमदार, बागलाण

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT