Baban Gholap, yogesh Gholap, Sharad Pawar & Saroj Ahire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Saroj Ahire News : शरद पवार यांच्या संकेताने सरोज अहिरेंची झोप उडणार?

NCP leaders Sharad Pawar`s signal may create new political situation-शिवसेनेचे योगेश घोलप शरद पवार यांची भेट घेतल्याने नव्या राजकीय संकेतांची चिन्हे

Sampat Devgire

Nashik Shivsena News : शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेतून मिळालेले संकेत राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदार सरोज अहिरे यांची झोप उडणार हे नक्की झाले आहे. महाविकास आघाडीच्या राजकारणात त्यांना कोणती गाडी मिळणार याचीच चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे. (Devlali constituency`s political situation may be critical in soon future)

देवळाली मतदारसंघात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्याभोवती राजकारण फिरत होते. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) ही जागा राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडेच राहील असे संकेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (BJP) आघाडीत आमदार सरोज अहिरे कुठे असतील याची उत्सुकता आहे.

देवळाली मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी रविवारी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनीदेखील त्यांना राजकीय सिग्नल दिल्याने खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे रविवारी बबन घोलप यांनी चर्मकार समाजाचा मेळावा घेत मुंबईत शक्तिप्रदर्शन केले. त्यांचे हे शक्तिप्रदर्शन प्रामुख्याने मातोश्रीवर दबाव आणण्यासाठी होते. मात्र, शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भावी राजकीय दिशा विचारात घेता, घोलप यांच्या शक्तिप्रदर्शनाचा संबंध थेट शिर्डी मतदारसंघाशी लावला जात आहे. त्यात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी धोरण ठरविलेले असल्याने घोलप यांच्या शक्तिप्रदर्शनाचा काय परिणाम झाला हे लवकरच कळेल.

या सर्व राजकीय घडामोडींमध्ये देवळाली मतदारसंघात राजकीय पत्ते पिसले जाणार हे मात्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीत सद्यःस्थितीत येथे राष्ट्रवादीचा आमदार आहे. विद्यमान आमदार सरोज अहिरे अजित पवार गटासोबत गेल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीत फूट नाही असे वरिष्ठ पातळीवर सांगितले जात आहेत.

अशा स्थितीत सरोज अहिरे यांनी `निधी`साठी थेट शरद पवारांशी शत्रुत्व घेतले आहे. त्यामुळे शरद पवार देतील तो उमेदवार ठरणार आहेत. त्यात योगेश घोलप यांनी हुशारीने डाव टाकला आहे. शिवसेना तर शिवसेना, अन्यथा शरद पवार गट असे त्यांचे धोरण आहे. यामध्ये सरोज अहिरेंचे काय होणार? या चर्चेत अहिरेंच्या समर्थकांचीही झोप उडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT