Sangram Jagtap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangram Jagtap Death Threat : 'संग्राम जगतापला दोन दिवसांत मारणार', मेसेज आला अन् ...! अजितदादांच्या आमदाराच्या जीवाला धोका!

NCP Sangram Jagtap Police : संग्राम जगताप हे अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये आहेत. मात्र, त्यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर अहिल्यानगरमधील कोतवाली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Roshan More

Sangram Jagtap News : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेनंतर आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. भाजपच्या आणि हिंदुत्तवादी संघटनाच्यार्यक्रमात सहभागी ते सहभागी होत आहे. ते सहभागी झालेले शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानमधील गैरहिंदू समाजाविरोधात काढलेला मोर्चा गाजला आहे. या मोर्चानंतरच आमदार जगताप अधिक चर्चेत आले. त्यातच बुधवारी रात्री त्यांच्या खासगी खासगी स्वीय सहाय्यक यांच्या मोबाइलवर धमकीचा मेसेज आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने टेक्स्ट मेसेज केला त्यामध्ये 'संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा', असा थेट जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

संग्राम जगताप हे अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये आहेत. मात्र, त्यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर अहिल्यानगरमधील कोतवाली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. त्यांनी घेतलेल्या हिंदुत्वासंदर्भातील भूमिकेमुळे त्यांनी ही धमकी आली की अन्य काही कारणामुळे याचा तपास सुरू आहे. दरम्यान, मेसेज करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्याकडून सायबर पोलिसांची मदत घेतली जात असून या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार अमिना शेख करत आहेत.

जगताप यांच्या विरोधात अपशब्द

हिंदुत्वाच्या मुद्यावर संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर, महेश लांडगे यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांनी जगताप यांच्या कुंटुंबीयांवर आक्षेपार्ह टीका करत अपशब्द वापरले होते. या प्रकरणी शेख यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच बादशहा शेख हे फरार झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT