PM Narendra Modi & NCP Flex Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Nashik News : राष्ट्रवादी म्हणते, धन्यवाद मोदीजी, तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र दिले!

आता आम्ही फुले, शाहू, आंबेडकरांचे खरे विचार घराघरात पोहोचवू

Sampat Devgire

Nashik NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्याने विविध आरोप केले जात होते. आता आमच्या पक्षाला राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान देऊन आमचा पक्ष भ्रष्टाचारी व परिवारवादी नसल्याची अप्रत्यक्ष पावती दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद, असा आगळा वेगळा फलक लावला आहे. हा फलक चर्चेचा विषय ठरला आहे. (NCP supporter kishor Shirsath Thanked modiji for NCP`s Entry in state government)

नाशिक (Nashik) शहरातील विविध पदाधिकारी आता मोकळेपणाने पुढे येऊन शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठींबा देतांना दिसत आहेत. राष्ट्रावादी युवक काँग्रेसचे (NCP) विभागीय अध्यक्ष किशोर शिरसाठ यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचे जाहीर केले आहे.

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष परिवारवादी आहे. त्याच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप आहेत. त्यात सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा अशा विविध आरोपांचा उल्लेख केला होता.

एक आठवड्याच्या अंतराने या पक्षाचे नेते अजित पवार यांनी चाळीस आमदारांसह भाजप सरकारला पाठींबा दिला. त्यातील नऊ जणांना मंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे या पक्षात पडलेल्या फुटीबाबत आता राजकीय कार्यकर्त्यांत चर्चा आहे. हा धागा पकडूनच शिरसाठ यांनी मोदीजी आणि भाजपला खोचक चिमटा घेत त्यांचे आभार व्यक्त करणारा फलक लावला आहे.

यासंदर्भात श्री. शिरसाठ म्हणाले, भाजप हा कोणत्या विचाराचा पक्ष आहे, त्याला अन्य पक्षांत फूट पाडण्यात किती रस आहे, हे आता सामान्य जनतेला कळले आहे. आमच्या पक्षातील स्थानिक नेते आजवर आम्हाला काम करू देत नव्हते. काम करणाऱ्यावर सतत दडपण असायचे. आता ते नेतेच भाजपसोबत गेल्याने आम्ही मोकळेपणाने व मनापासून काम करू. शरद पवार यांचे कार्य आणि महात्मा फुले. छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचवू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT