Nilesh Lanke Vs BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke Vs BJP : नीलेश लंकेंना भाजप घेरण्याच्या तयारीत; पारनेरच्या जागेसाठी जोरदार 'फिल्डिंग'

BJP show of strength for Parner assembly seat : पारनेरमध्ये मेळावा घेऊन भाजपने विधानसभा मतदारसंघासाठी दावा करत नीलेश लंकेंना घरच्या मैदानावर घेरण्याची तयारी केली आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भाजपने अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केलीय. कुठेही कमी पडायचं नाही, असा निर्धार केलाय. यातच लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघात झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. त्याचा वचपा घेण्याच्या तयारीत भाजप आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पारनेरमध्ये मेळावा घेत, जोरदार शक्तिप्रदर्शन करत, पारनेर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. खासदार नीलेश लंके यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पारनेरमध्ये घेरण्याची तयारीच भाजपने केली आहे.

भाजपचे (BJP) प्रभारी बिपीन शिक्का यांच्या नेतृत्वाखाली पारनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, मंडल प्रभारी शुभांगी सप्रे, प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात, ऋषिकेश गंधाडे आदी भाजपचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीला भाजप महायुतीकडून खूप गाजावाजा झाला. परंतु विधानसभा निवडणुकीला अतिशय शांतपणे भाजप नगर जिल्ह्यात तयारी करत आहे. भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे यांचा नीलेश लंके यांनी पराभव केला. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

या विधानसभा निवडणुकीत या पराभवचा वचपा घेण्याची तयारी भाजपने केली आहे. पारनेरमध्ये भाजपने कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन बूथ केंद्रनिहाय आढावा घेतला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महायुती उमेदवाराचे काम करण्याच्या सूचना दिल्या. सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

भाजप नेते काय निर्णय घेणार

परंतु भाजप कार्यकर्ते वेळा आक्रमक झाले. पारनेर विधानसभा मतदारसंघाची जागा मिळावी, यासाठी प्रभागी बिपीन शिक्का यांच्याकडे आग्रह धरला. कार्यकर्त्यांनी पारनेर विधानसभेसाठी संधी द्या, भाजपचा उमेदवार निवडून आणू, असा विश्वास दिला. यावर विश्वनाथ कोरडे यांनी वरिष्ठांना कार्यकर्त्यांच्या भावना कळवणार असल्याचे आश्वासन दिले. भाजप कार्यकर्त्यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा करत खासदार नीलेश लंके यांना आव्हान दिले आहे. भाजपचे नेते कार्यकर्त्यांच्या मागणीवर काय भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT