Sharad-Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Politics: उद्धव-राज ठाकरेंचे झाले, आता शरद पवार देणार भाजपाला आव्हान!

NCP Sharad Pawar's morcha in Nashik, Loan waiver, law & Order isue against BJP -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उद्या भाजप विरोधात नाशिक मध्ये शक्ती प्रदर्शन

Sampat Devgire

NCP Sharad Pawar News: दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि मनसेने भाजप विरोधात शक्ती प्रदर्शन केले. यानिमित्ताने नाशिक शहराच्या ढासळलेल्या कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेच्या प्रश्नावर भाजपला घेरण्यात आले. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आपली ताकद दाखवणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज नाशिकला होत आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होईल. राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या निमित्ताने एकत्र येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्या नाशिक शहरात मोर्चा काढणार आहे. कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्य शासनाने चालढकल केली आहे. नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था आणि गैरकारभार या प्रश्नावर भाजपच्या विरोधात हा मोर्चा असेल, असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण यावर सध्या प्रशासन काम करीत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आणि इच्छुकांनी मरगळ झटकून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कापसाची आयात बंद करावी, शेतीच्या यंत्रसामग्री वरील जीएसटी रद्द करावा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करावे या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा होणार आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांसह विविध नेते या मोर्चासाठी नाशिकला दाखल झाले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेना आणि मनसे पक्षाच्या शक्ती प्रदर्शनानंतर भाजपला घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने ही कंबर कसली आहे.

_____

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT