Prajakt Tanpure  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure : पवारसाहेबांच्या शिलेदाराचा मोठा निर्णय; 'या' मुद्यावर घेतली माघार

NCP SharadChandra Pawar party Prajakt Tanpure Rahuri assembly constituency Ahilyanagar EVM machine data verification : राहुरी मतदारसंघातील माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ईव्हीएम मशीनमधील डेटा पडताळणीच्या तपासणीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची दाणादाण उडाली. महायुतीला 234 असे प्रचंड बहुमत मिळाले, तर 'मविआ'ला फक्त 50 जागांवर समाधान मानावं लागलं. यात महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना पराभवानाचा धक्का बसला.

महाविकास आघाडीने या पराभवाचे खापर 'ईव्हीएम'वर फोडले. 'ईव्हीएम' मशीनमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत मतदान, डेटा पडताळणीसाठी अर्ज दाखल केले. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला. परंतु आता या दाखल अर्जावर तनपुरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

'ईव्हीएम' मशीनमधील डेटाची तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले राहुरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली आहे. तसा अर्ज त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. प्राजक्त तनपुरे यांनी पाच केंद्रांतील 'ईव्हीएम'विषयी शंका उपस्थित केली होती.

या 'ईव्हीएम' (EVM) मशीन पडताळणीसाठी त्यांनी 2 लाख 36 हजार रुपये भरले होते. माघार घेतल्याने त्यांनी भरलेले शुल्क देखील परत मिळणार आहे. विधानसभा मतदारसंघातील पराभूत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांना निकालानंतर 'ईव्हीएम'च्या पडताळणीसाठी सात दिवसांची मुदत होती.

23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला असताना 30 नोव्हेंबरपर्यंतच्या डेटा तपासणीसाठी अर्ज करता येणार होते. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील बारापैकी दहा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे डेटा तपासणीसाठी अर्ज सादर केले होते.

यामध्ये संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांनी 14, शिर्डीतून प्रभावती घोगरे यांनी 2, कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांनी 17, नेवाशातून शंकरराव गडाख यांनी 10, राहुरीतून प्रजाक्त तनपुरे यांनी 5, पारनेरमधून राणी लंके यांनी 5, कोपरगावातून संदीप वर्पे यांनी 1, पाथर्डी-शेवगावमधून प्रताप ढाकणे यांनी 2, अहमदनगरमधून अभिषेक कळमकर यांनी 3 व श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांनी 2, अशा 74 ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी अर्ज करण्यात आले होते.

या 10 पराभूत उमेदवारांनी 47 हजार 200 रुपये प्रति मशीन शुल्कासह रक्कम भरली. मात्र या प्रक्रियेत व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी होणार नसल्याचे स्पष्ट होताच प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेला अर्ज माघारी घेतला. यानुसार प्राजक्त तनपुरे यांनी भरलेले शुल्क देखील परत मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT