Shashikant Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation Controversy: शशिकांत शिंदे यांनी थेटच सांगितले,... तर छगन भुजबळ यांनी राजीनामा देऊन सरकार बाहेर पडावे!

NCP Shashikant Shinde criticized Chhagan Bhujbal, deemand Resignation of Chhagan Bhujbal-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांना ठणकावले

Sampat Devgire

NCP Shashikant Shinde news: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ यांना घेरले. भुजबळ यांच्या भूमिकेवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या. त्यावर छगन भुजबळ यांनी सातत्याने विरोध केला. त्यामुळे आता हा महायुती सरकार साठी दुहेरी पेच निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या प्रश्नावर छगन भुजबळ यांना कोंडीत पकडले आहे. राज्य शासनाने मराठा समाजाला दिलेले स्वतंत्र दहा टक्के आरक्षण टिकणार आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

त्यामुळे छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाबाबत निर्णय मान्य नसेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावे, असे आव्हान शिंदे यांनी दिले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात गंभीर पेच निर्माण झाला आहे. यामध्ये महायुती सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरक्षणाचे समर्थन केले आहे.

यापूर्वी भुजबळ यांनी मराठा समाजाला एसईबीसी चे दहा टक्के आरक्षण नको आहे का असा प्रश्न केला होता. न्यायालयाने याबाबत शासनाला विचारणा केली आहे. यावरून मराठा समाजाला नेमके कोणते आरक्षण मिळणार? असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने आपली भूमिका कोणती हे जाहीर केले पाहिजे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला तीव्र विरोध केला आहे. ते सातत्याने जाहीरपणे विधाने करून राज्य शासनाच्या निर्णयालाच आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारमधील मंत्र्यांमध्येच दोन भूमिका निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.

याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रेयवादाच्या लढाईत इतरांना मागे टाकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महायुती सरकार मध्येच मराठा आरक्षणावरून श्रेय वादाची लढाई सुरू झाल्याचे स्पष्ट होते.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT