NCP Wins 5 seats Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ZP Election result : वाशिममध्ये `राष्ट्रवादी`ला सर्वाधिक ५ जागा

Sampat Devgire

वाशिम : जिल्हा परिषदेच्या (Washim ZP Result) १४ गटाचे निकाल जाहीर झाले असून, (14 seats result declaired) यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला (NCP is biggest party) आहे. १४ जागांपैकी ५ जाग्यावर विजय मिळवला आहे. (NCP wins 5 out of 14) राष्ट्रवादी काँग्रेस ५, भाजप- २, शिवसेना- १, काँग्रेस- २, वंचित - २, इतर- २ जागा मिळाल्या.

वाशिम जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी ठरला आहे.मात्र जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या लढती पैकी उकळी जिल्हा परिषद गटामधून शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी विजयी झाले तर असेगाव जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे विजयी झाले आहेत.विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित कोळदा जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या.

जाहीर निकाल असे, उकळी पेन गट- सुरेश मापारी (शिवसेना), कवठा सर्कल गट- वैभव सरनाईक (काँग्रेस), काटा गट- संध्याताई देशमुख ( काँग्रेस), भामदेवी गट - वैशाली लळे (वंचित आघाडी), पांघरी नवघरे गट- लक्ष्मी लहाने (वंचित), असेगाव गट - चंद्रकांत ठाकरे (राष्ट्रवादी), भर जहागीर गट- अमित खडसे (राष्ट्रवादी), कंझरा गट- सुनीता कठोले (राष्ट्रवादी), दाभा गट - राजेश राठोड (राष्ट्रवादी), तळप गट- शोभा गावंडे (राष्ट्रवादी), कुपटा गट- उमेश ठाकरे (भाजप), फुल उमरी गट- सुरेखा चव्हाण (भाजप), पार्डी गट- स्वरस्वती चौधरी (अपक्ष), गोभणी गट- पूजा भुतेकर (जनविकास आघाडी).

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT