NCP pary workers protest Against Governer at Jalgaon.
NCP pary workers protest Against Governer at Jalgaon. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जळगावला राष्ट्रवादीने राज्यपालांचा एकदा नव्हे दोनदा निषेध केला!

Sampat Devgire

जळगाव : राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी (Governers Bhagatsingh Koshiyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत औरंगाबाद येथे केलेल्या वक्तव्याचा जळगाव (Jalgaon) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निषेध करण्यात आला, त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत औरंगाबाद येथे वादग्रस्त वक्तव्य केले. आज ते जळगाव दौऱ्यावर होते. जैन हिल्स येथे कार्यक्रम आटोपून ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यक्रमास जात असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकात त्यांच्याविरूध्द आंदोलन केले, यावेळी कार्यकर्त्यांनी राज्यपाल कोश्‍यारी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी पोलीसांनी पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

विमानतळाकडे जाताना पुन्हा निषेध

राज्यपाल कोश्‍यारी विद्यापीठातील कार्यक्रम आटोपून विमानतळाकडे जात असताना, आकाशवाणी चौकाजवळील उड्डाणपुलावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी, पोलीसांनी यावेळी मुविकोराज कोल्हे, विनोद देशमुख, पुरूषोत्तम चौधरी, रहिम तडवी, निषेधाच्या घोषणा देत काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला.

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे निवेदन

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करणारे निवेदन संभाजी बिग्रेड व मराठा सेवा संघातर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले, यावेळी संभाजी ब्रिगेडचे सचिव विजय पाटील तसेच अविनाश बाविस्कर, संजय चव्हाण, खुशाल चव्हाण, सुजित शिंदे, हिरामण चव्हाण, मराठे महाराज, भगवान शिंदे आदी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपोषणाला पाठींबा देणारे निवेदनही दिले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT