NCP Ambadas Khaire with Party workers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP news Nashik : आमदारांचे स्टिकर लावून होणारे गैरप्रकार थांबणार केव्हा?

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे पोलिसांना साकडे

Sampat Devgire

NCP Nashik News : शहर व जिल्ह्यात सध्या वाहनांना आमदारांचे स्टिकर लावून फिरण्याचे गैरप्रकार राजरोस होत आहेत. या वाहनांत आमदार नसतात, मात्र नागरिकांवर व प्रशासनावर दहशत निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असल्याने नागरिक, प्रशासन दोन्ही त्रस्त आहेत. याबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे. (NCP Youth wing president Ambadas Khaire meet CP on Missuse of MLA stickers)

नाशिक (Nashik) शहर व परिसरात आमदारांचे स्टिकर लावून अनेक वाहने फिरताना आढळतात. प्रत्यक्षात त्या वाहनांत आमदार नसतात. काही आमदारांच्या समर्थक तर अनेक वाहनांवर हे स्टिकर लावून बडेजाव दाखवतात. त्याचा वापर पोलिस (Police) व नागरिकांत दहशत निर्माण करण्यासाठी केला जातो, अशी तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) अंबादास खैरे (Ambadas Khaire) केली आहे.

बेकायदेशीर पद्धतीने आमदार स्टिकर लावलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले.

जिल्ह्यात विविध प्रकारे दहशत माजविण्याचे प्रकार समोर येत असताना आता हा नवीन प्रकार नागरिकांसमोर आला आहे. शहर व जिल्ह्यात काही वाहनचालकांकडून आमदार असे स्टिकर काचेवर लावण्यात येते. प्रत्यक्षात या पदावरील व्यक्ती व वाहन यांचा परस्पर काही संबंध नसतो. काही आमदारांच्या घरातील सदस्यांनी तर काही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनांवर बेकायदेशीर पणे हे स्टिकर लावले आहे.

प्रशासकीय अधिका-यांवर व नागरिकांवर दबाव आणण्यासाठी तसेच पोलीस प्रशासनाच्या कारवाई पासून वाचण्यासाठी असे प्रकार मुद्दाम केले जातात. कोणताही लोकप्रतिनिधी नसताना तसे भासविणे हा गुन्हा असून लोकप्रतिनिधी असल्याचा अभास निर्माण करून शहर व जिल्ह्यात जनतेमध्ये दहशत माजविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.

यावेळी कृष्णा काळे, डॉ संदीप चव्हाण, निखिल भागवत, सागर बेदरकर, राहुल कमानकर, संतोष भुजबळ, सुनील घुगे, प्रवीण बोराडे, अविनाश मालूनजकर, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT