Ambadas Khaire, NCP
Ambadas Khaire, NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस महापौरांच्या घरापुढे खोदणार खड्डे!

Sampat Devgire

नाशिक : राज्यातील पाऊस (Rain) आणि खड्डे (Pits) सगळ्यांनाच त्रस्त करीत आहे. नाशिक शहरातील अपवाद वगळता जवळपास प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहेत. त्याबाबत इशारे देऊनही महापालिका दुर्लक्ष करते. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने महापौरांचे निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यापुढे (In front of Mayor`s residence)खड्डे करण्याचा इशारा दिला आहे. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची दखल महापालिका घेणार का? याची नागरिकांना उत्सुकता लागली आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सातत्याने विविध संघटना, राजकीय पक्षांनी निवेदने, आंदोलने केली आहेत. महापालिकेने एकीकडे खड्डे बुजविण्यासाठी मोठा खर्च केल्याचा दावा केला आहे. दुसरीकेड खड्डे कायम आहेत. शहरातील सर्व खड्डे पुढील १५ दिवसांमध्ये बुजवा, अन्यथा महापौरांचे रामायण निवासस्थान, स्थायी समितीचे सभापती आणि सत्ताधारी नगरसेवकांच्या घरांसमोर खड्डे करू, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

श्री. खैरे म्हणाले, की स्मार्ट सिटीचा टेंभा मिरविणाऱ्या स्मार्ट नाशिकची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे पडलेल्या खड्ड्यांसोबत गॅस पाइपलाइन, वायर्स अन्‌ पावसाळी गटार या कामांसह विविध कामांच्या नावाखाली खोदलेल्या रस्त्यांमुळे नाशिककर हैराण झाले आहेत. शहरातील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होतात. जनतेच्या कोट्यावधी रुपयांचे रस्ते एकाच पावसात खड्डेमय झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाशिकमध्ये आले असताना महापालिका प्रशासनाने शहरातील खड्ड्यात माती व मुरूम टाकून मलमपट्टी केली. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून सर्वत्र चिखल झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महापालिका सत्ताधारी व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने शहरातील खड्ड्यांचे श्राद्ध घालत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. मात्र, सुस्त सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. दिवाळीचा सण जवळ येत असल्याने नाशिककर खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. मात्र, त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत असून, कमरेचे व मणक्याचे आजार उदभवू लागले आहेत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT