नाशिक : राष्ट्रवादी (NCP) युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पंचवटी गणेशवाडी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सी.सी.टीव्ही कॅमेरे व डीव्हीआर बसविले. या भागातील बेकायदा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या (Maharashtra Police) मदतीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या भागातील सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, खून, हाणामारी यासारखे गुन्हे घडल्यावर तातडीने गुन्हेगारांना पकडण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमरे असणे अत्यंत महत्वाचे बनले आहे. गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमऱ्याच्या फुटेजची मदत पोलिसांना होत असते. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमरे असल्यास गुन्हेगार ही गुन्हा करण्यास घाबरत असतो. गुन्हेगारांवर वचक ठेवून पोलिसाच्या मदतीकरिता व स्थानिक नागरिकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले सी.सी.टीव्ही कॅमेरे व डीव्हीआर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी स्वखर्चाने बसविले. त्यांच्या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे.
यावेळी रमेश गिते, कैलास शिरसाठ, नारायण बेंडकुळे, अशोक अभंग, शरद अभंग, अजय सोनवणे, गोविंद गरकळ, मयुर बेंडकुळे, विकास गिते, दशरथ मोकळ, किरण शेवरे, विकी आनंदराव, संदीप पगार, मोहन वायकांडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.