MLA Dilip Borse & Ex MLA Sanjay Chavan
MLA Dilip Borse & Ex MLA Sanjay Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

धक्कादायक; आमदारांनी नव्हे, कंत्राटदारांनी आणला १८ कोटींचा निधी?

Sampat Devgire

सटाणा : बागलाण (Nashik) तालुक्यातील काही ठेकेदार व अधिकाऱ्यांनी आमदार दिलीप बोरसे (MLA Dilip Borse) यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेतला. त्यांनी संगनमताने १८ कोटींचा निधी बागलाणला वळवला. ही बाब उघड झाल्यामुळेच शासनाने (Maharashtra Government) हा निधी थांबवला, असा गौप्यस्फोट माजी आमदार संजय चव्हाण (Ex MLA Sanjay Chavan) यांनी केला आहे. (Contractors taken disadvantage of MLA Dilip Borse)

ते म्हणाले, शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने नाशिक जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील विकासकामांसाठी मंजूर केलेल्या ३८ कोटींच्या निधीतून १८ कोटींचा निधी परस्पर बागलाण तालुक्याला कसा देण्यात आला, असा आक्षेप पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे घेतला.

गेल्या अनेक दिवसांपासून बागलाण तालुक्याचा १८ कोटींचा निधी माजी आमदार संजय चव्हाण यांनीच रद्द केल्याचा आरोप होत असल्याने या आरोपांना उत्तर देऊन जनतेसमोर सत्य परिस्थिती मांडण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, बागलाण तालुक्यातील काही ठेकेदारांनी भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्यांचे शिफारसपत्र मिळविले आणि अधिकाऱ्यांशी आर्थिक संगनमत साधून सामाजिक न्याय विभागाच्या ३८ कोटींपैकी १८ कोटींचा निधी तालुक्यासाठी मंजूर करून घेतला.

या निधीला मंजुरी मिळताच आमदार बोरसे यांनी निधी मंजुरीच्या बातम्या स्वतःच्या नावावर प्रसिद्ध केल्याने पालकमंत्री भुजबळ, कृषिमंत्री भुसे व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आक्षेप नोंदवला आणि विरोधी आमदाराला १८ कोटी तर जिल्ह्यातील दोन मंत्री व इतर आमदारांना फक्त २० कोटी रुपयांचाच निधी देण्यास मंजुरी कोणत्या आधारावर दिली, असा जाबही विचारला.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सामाजिक न्याय विभागाला तत्काळ चौकशीचे आदेश दिले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी समिती स्थापन करून या गंभीर प्रकरणाची चौकशी केली असता काही ठेकेदारांनी आमदार बोरसेंच्या पत्राद्वारे अधिकाऱ्यांशी आर्थिक संगनमत करत जुनीच कामे नव्याने दाखवून १८ कोटींचा निधी मंजूर केल्याचे वास्तव चौकशीत समोर आले. त्यामुळे शासनाने तालुक्याचा १८ कोटींचा निधी तत्काळ स्थगित केला. मंजूर निधीच्या बातम्या आमदार दिलीप बोरसे यांनी प्रसिद्धीस दिल्या नसत्या तर मंत्री व आमदारांना आक्षेप घेण्याची संधीही मिळाली नसती. त्यामुळे तालुक्याचा १८ कोटींचा मंजूर निधी रद्द होण्यास आमदार बोरसेच जबाबदार असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.

दरम्यान, ताहाराबाद (ता. बागलाण) ग्रामपंचायतीच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे काम दाखवत नविन काम केल्याचे काही अधिकारी व ठेकेदारांनी भासवून शासनाचे कोट्यवधी रूपये हडप केले आहेत. असे प्रकार इतर विभागाच्या कामांमध्येही होत असून लवकरच त्याचेही बिंग फुटेल आणि जनतेचा पैसा लुटणारे ठेकेदार व अधिकारी उघडे पडतील, असेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

...

यापूर्वी मी आणि पत्नी दोघेही आमदार असताना बागलाण तालुक्याचा विकास डोळ्यासमोर ठेऊनच आम्ही शासनाचा निधी विकासकामांसाठी वापरला आहे. माझे जातवैधता प्रमाणपत्र रद्द झाले हे जगजाहीर असताना त्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असल्याने पक्षाचे काम करणे ही माझी नैतीक जबाबदारी आहे. त्या जबाबदारीला पाठ देऊ शकत नाही.

- संजय चव्हाण, माजी आमदार, बागलाण

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT