Eknath shinde & Nilamtai Gorhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी बाबत नीलमताई गोऱ्हे स्पष्टच म्हणाल्या...

Neelamtai Gorhe; Neelamtai Gorhe's statement that Eknath Shinde is not upset-विधान परिषदेच्या सभापती नीलमताई गोऱ्हे यांच्या शिवसेना ठाकरे पक्षाला कान पिचक्या

Sampat Devgire

Neelamtai gorhe News: पालकमंत्रीपदाच्या नियुक्ती आणि त्यावरील वाद अद्याप संपलेला नाही. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण नाराज असल्याचे संकेत देण्याचा वारंवार प्रयत्न करीत असतात. त्यामुळे महायुतीत तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

गेले काही दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जाते. मंत्रिमंडळाच्या बैठकीला त्यांची अनुपस्थिती, हे त्याचे एक कारण आहे. त्यामुळे महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला डावलले जात आहे की काय? याचीही चर्चा आहे.

यासंदर्भात विधान परिषदेच्या सभापती नीलमताई गोऱ्हे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुणे दौऱ्यात ते सभापती गोऱ्हे यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर निवांत गप्पा मारल्या. या दरम्यान ते कुठेही नाराज असल्याचे जाणवले नाही, असे मत सभापती गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

राज्य मंत्रिमंडळाच्या संख्या आणि खाते वाटपाबाबत थोडेफार इकडेतिकडे होऊ शकते. मात्र राज्यात एखाद दुसरा अपवाद वगळता कुठेही फारसे वाद झालेली नाही. आमच्या मंत्र्यांना चांगली खाती मिळाली. पालकमंत्री पदाबाबत काही वाद असलाच तर आमचे नेते त्यातून मार्ग काढतील, असा दावाही श्रीमती गोऱ्हे यांनी केला.

शिवसेनेच्या फुटी संदर्भातही त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मतदारांनी भरभरून मते दिली आहेत. पुन्हा एकदा आमच्या पक्षाला कौल मिळाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांचा मार्ग योग्य आहे, हे स्पष्ट होते.

यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर टीका केली. त्या म्हणाल्या, निवडणुकीचा निकाल पाहता एकनाथ शिंदे यांचा मार्ग योग्य आहे. आमचे जुने सहकारी मात्र भरकटलेले आहेत. याची त्यांना अद्यापही जाणीव झालेली दिसत नाही. कधी ना कधी त्यांनाही जाणीव होईल आणि त्यांना योग्य मार्ग सापडेल. असा टोमणा त्यांनी मारला.

राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत सातत्याने चर्चा होत आहे. राज्यात या संदर्भात महिला अत्याचाराच्या काही घटना चर्चेत आहेत. या अनुषंगाने महिलांना अधिक सुरक्षा आणि त्या कायद्याची अंमलबजावणी गांभीर्याने कशी होईल, या संदर्भात लवकरच राज्यातील प्रमुख संस्थांच्या उपस्थितीत ६ फेब्रुवारीला बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT