Nashik Paper Leak History: राजस्थान पोलिसांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET पेपर फुटीचे रॅकेट उघडकीस आणले. त्याचे थेट कनेक्शन नाशिकशी उघड झाले. या संदर्भात शुभम खैरनार याला अटक करण्यात आली आहे.
वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट ही प्रवेश परीक्षा महत्वाची असते. यंदा देशभरात 22 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देण्याची दिली होती. ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे.
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेच्या पेपर फुटीचे थेट कनेक्शन नाशिकशी आहे. या संदर्भात टेली प्रिंटर वर पहिली कॉपी नाशिक मधूनच लीक झाल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात शुभम खैरनार याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने हालचाल करत ही कारवाई केली. संदर्भात राजस्थानमध्ये या रॅकेटमधील १२ जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. महाराष्ट्रातील नऊ हजार विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे.
या प्रवेश परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी नाशिक चर्चेत आले आहे. मात्र गेल्या 30 वर्षात नाशिक मध्ये स्पर्धा परीक्षांच्या पेपर लीक प्रकरणात अनेकांना अटक झाली आहे. त्याची सुरुवात पोलीस उपनिरीक्षक परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेने झाली.
याबाबत विंचूर गवळी येथील एका प्रशिक्षण केंद्राच्या संचालकांना तीस वर्षांपूर्वी अटक झाली होती. यूपीएससी आणि एमपीएससी च्या पेपर फुटी प्रकरणी देवळाली कॅम्प येथील एकाला पोलिसांनी अटक केली. अनेक परीक्षांचे पेपर फोडण्यात माहीर असलेल्या या युवकावर अद्याप खटला सुरू आहे.
या प्रकरणात नाशिकच्या निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांवर देखील कारवाई झाली आहे. तीस वर्षात नाशिक मध्ये पेपर फुटी प्रकरणी अनेकदा कारवाई झाली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटी प्रकरणी नाशिक हे बदनाम झाले. काही परीक्षांचे केंद्र म्हणून नाशिकला नापसंती देण्यात आली.
पुन्हा एकदा वैद्यकीय प्रवेश परीक्षा च्या प्रश्नपत्रिका लीक झाल्याने नाशिक चर्चेत आले आहे. अनेक स्पर्धा परीक्षांचे पेपर फोडण्यात नाशिकच्या गुन्हेगारांचा संबंध आला आहे. त्यामुळे नाशिक हे पेपर लीक प्रकरणी गेल्या 30 वर्षांपासून बदनाम मानले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.