Shivsena leader Arvind Sawant
Shivsena leader Arvind Sawant Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ज्यांनी उद्धव ठाकरे यांचा छळ केला, त्यांना डोक्यात ठेवा!

Sampat Devgire

नाशिक रोड : शिवसैनिकांनी (Shivsena) जगेल तर भगव्यासाठी, मरेल तर भगव्यासाठी अशी शपथ घ्यावी. नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघात एक खासदार सोडला तर एकही आमदार नाही. आघाडी झाली तरी शिवसेनेचेच बहुमत पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना उपनेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केले. (Shivsena workers should active in public for party)

येथील पाटीदार भवनमध्ये शिवसेना नाशिक पूर्व मतदारसंघात शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते.

या वेळी उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व्यासपीठावर होते.

अरविंद सावंत म्हणाले, की देशात भाजप जनतेत भ्रम निर्माण करत आहे. सातत्याने धर्म, मंदिरे, मशीद यावर बोलले जाते. स्वतःमध्ये धमक नाही म्हणून इतरांच्या खांद्यावर भगवा दिला जातो. ज्यांनी उद्धव ठाकरे यांचा छळ केला, त्यांना डोक्यात ठेवण्याचे शिवसैनिकांनी वचन घ्यावे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर प्रथम शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. कोरोना काळात जनतेचे प्राण वाचविण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचे जगाने कौतुक केले.

यावेळी माजी महापौर नयना घोलप, महिला आघाडी संपर्क संघटक रंजना नेवाळकर, जयंत दिंडे, युवासेना जिल्हाधिकारी दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, महेश बडवे, माजी नगरसेवक रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, केशव पोरजे, माजी नगरसेविका जयश्री खर्जुल, ज्योती खोले, सुनीता कोठुळे, मंगला आढाव, रंजना बोराडे, शोभा मगर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT