BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahrashtra Politics : नाशिक पदवीधरमध्ये येणार नवीन ट्विस्ट; 'अनपेक्षित उमेदवार असू शकतो'

सरकारनामा ब्यूरो

Mahrashtra Politics : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त २ दिवस उरले आहेत. त्यातच काँग्रेसकडून (Congress) विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचे ठरले असले तरी त्यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

तर दुसरीकडे भाजपचे अजुनही तळ्यात मळ्यात सुरु आहे. अद्याप उमेदवारच फायनल झालेला नाही. मात्र, भाजपचे आमदार राम शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे नाशिक पदवीधरमध्ये नवा ट्वीस्ट निर्माण होणार असल्याची चर्चा आहे.

राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले होते ''नाशिक पदवीधरसाठी अनपेक्षित उमेदवार देखील असू शकतो''. त्यामुळे भाजप नेमकं कोणता अनपेक्षित उमेदवार जाहीर करते? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर काँग्रेसकडून अजून देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसही सावध भूमीका घेत असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे म्हणाले, ''नाशिक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर होणार आहे. मात्र, त्या उमेदवारीबाबत विचार विनिमय सुरु आहे. आमच्यासमोर अनेक नावे आहेत. त्यापैकी वेगवेगळी अनेकांची मतमतांतर आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यामध्ये विलंब होत आहे. पाच जिल्ह्यांचा व्याप आहे, त्यामुळे ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून भाजपचे नेतृत्व यावर चर्चा करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

''मात्र, तरीही आज किंवा उद्या भाजपचा नाशिक पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होईल. त्यामध्ये आमच्याकडे राजेंद्र विखे, मीनाक्षी पाटील, धनंजय विसपुते ही नावे आहेत. तसेच यापेक्षाही वेगळे नाव येऊ शकते. नाशिक पदवीधरसाठी अनपेक्षित उमेदवारही असू शकतो'' असे सूचक विधान त्यांनी केल्यामुळे मतदार संघात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, शिंदे यांनी अनपेक्षित उमेदवारही असू शकतो, असे सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप आता अनपेक्षित उमेदवार नेमकी कोणता जाहीर करणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दुसरीकडे डॉ. राजेंद्र विखे यांचे अद्याप ठरत नाहीये. दुसऱ्या नावांवर चर्चा सुरु असली तरी नाशिक पदवीधरमध्ये नगर जिल्ह्यातूनच रसद कमी पडते. त्यामुळे नगर जिल्ह्यातील उमेदवार अशी चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे तांबेना कोण टक्कर देणार हे दोन दिवसात स्पष्ट होणार असले तरी भाजप समोर मोठा पेच असल्याचे बोलेल जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT