Nagar Politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Politics: थोरातांना विखेंनी पुन्हा सुनावले; 'नथीचे कौतुक करून घेणाऱ्यांनी...'

Nilwande Dam:जलनायक कोणीही होत असले तरी...

Pradeep Pendhare

Nagar: निळवंडे धरणाच्या श्रेयवादाचे कवित्व अजून काही संपायला तयार नाही. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. 'जलनायक कोणीही होत असले तरी, नथीचे कौतुक करून घेणाऱ्यांनी नाक देणाऱ्यांना विसरू नये', असा टोला मंत्री विखे यांनी आमदार थोरातांना लगावला आहे.

पालकमंत्री विखे यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या उजव्या कालवातून पाणी सोडण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार वैभव पिचड, नगर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजपचे अकोले तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, जलसंपदाचा विभागाचे बाळासाहेब शेटे आणि कैलास ठाकरे उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले, "भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या उभारणीसाठी अकोलेकरांनी खूप मोठा त्याग केला आहे. धरण आणि कालवे उभारणीसाठी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही". जलनायक कोणीही होत असले तरी, नथीचे कौतुक करून घेणाऱ्यांनी नाक देणाऱ्यांना विसरू नये, असा टोला मंत्री विखे यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना लगावला आहे.

'डाव्या कालव्याप्रमाणेच उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा शब्द महायुती सरकारने पूर्ण केला आहे. त्याचे समाधान वाटत आहे. अनेक वर्षे पाण्यासाठी या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागला. आता पाण्याची प्रतिक्षा संपली आहे. शेतकऱ्यांना जमिनी दिल्या नसल्या, तर हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता. डाव्या कालवातून पाणी सोडल्यानंतर तालुक्यातील काही गावांतील शेकतऱ्यांच्या पाण्याचे नुकसान झाले. त्याच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव महामंडळाच्या नियमाकडे मंडळाकडे मंजुरीसाठी पावण्यात आला आहे. या नुकसानीची मदत लवकर मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे', असे मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT