नाशिक : राष्ट्रीय महामार्ग (National highway) लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीबरोबर काम करण्यास जेएनपीटीने (JNPT) सहमती दर्शविल्याने निफाड (Niphad) येथे ड्रायपोर्ट प्रकल्प (Dryport) उभारण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रायपोर्ट प्रकल्प उभारण्याच्या कामाला गती येणार आहे. (Dryport project of Niphad will be joint project)
याबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, निफाडच्या ड्रायपोर्टबाबत खासदार झाल्यापासून संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या बैठका घेतल्या, त्यावेळी महत्वाचे नेते उपस्थित होते. परंतु, सरकार बदलल्यानंतर दोन वर्षात संबंधितांनी जागेबाबत कुठलेच स्पष्टीकरण दिलेली नाही. माझा मतदारसंघ असल्याने मी संबंधित विभागाच्या मंत्रीमहोदयांशी सातत्याने चर्चा करत होते, त्यांनी आश्वासन दिले आहे. आपल्या मतदारसंघात माझे लक्ष आहे. त्यामुळे श्रेयवादात न अडकता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल जलद गतीने देश-विदेशात पोचविता यावा यासाठी ड्रायपोर्ट उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या. राज्यात खूप आयसीडी ( इंटिग्रेटेड कंटेनर डेपो) असल्याने नवीन आयसीडी प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र रेड झोनमध्ये होता. मात्र आता राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीबरोबर काम करण्यास जेएनपीटी सहमती दर्शविल्याने ड्रायपोर्ट प्रकल्प निफाड येथे उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांत भाजीपाल्यासह द्राक्ष, कांदा, डाळिंब आदी मालाचा समावेश आहे. उत्पादित शेतमाल विक्रीसाठी जलदपणे देश-विदेशात पोचविता यावा यासाठी जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी प्रस्तावित असलेल्या निफाड साखर कारखान्याच्या जागेवर विविध कर आणि कर्ज थकीत असल्याने या जागेवर प्रकल्प होणे अवघड वाटत होते. खासदार हेमंत गोडसे यांनी पुढाकार घेत हा प्रकल्प उभारण्यासाठी नियोजित जागेवर काही अडचण येत असल्यास प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाऊ नये म्हणून शिलापूर आणि मुंडेगाव येथील जागा ड्रायपोर्टसाठी सुचविला होत्या; परंतु राज्यात आयसीडी (लोड कंटेनर डेपो) खूप असल्याने नवीन आयसीडी प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र रेड झोनमध्ये मोडत असल्याने काही वर्षांपासून ड्रायपोर्ट प्रकल्प प्रलंबित होता.
या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट पुढे सरसावले आहे. मल्टिमॉडेल औद्योगिक पार्कने (एमएमआयपी) ठरविले तर आयसीडी म्हणून ते नाशिकला वगळण्याची परवानगी राज्याकडून मिळवू शकतात. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट (एनएचएलएम) ही नॅशनल हायवेची कंपनी असून, काही दिवसांपूर्वी नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट या कंपनीने जेएनपीटीला पत्र लिहीत आपण सोबत काम करून नाशिक येथे ड्रायपोर्ट उभारू या, अशी विनंती केली होती. या प्रस्तावास नुकतीच जेएनपीटीने सहमती दर्शविली आहे. याविषयीची माहिती जेएनपीटीने शिपिंग मंत्रालयाला कळविली आहे. यामुळे आयसीडी अडचण दूर होणार असून, निफाड येथे ड्रायपोर्ट प्रकल्प उभारण्याचा मार्ग आता लवकरच सुकर होणार आहे.
ड्रायपोर्ट प्रस्तावास शिपिंग मंत्रालयाकडून लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याने राष्ट्रीय महामार्ग आणि जेएनपीटी हे संयुक्तपणे ड्रायपोर्ट उभारणार आहेत.
- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.