Nilimatai Pawar & Nitin Thackray
Nilimatai Pawar & Nitin Thackray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MVP election: निफाड तालुका ठरणार किंगमेकर?

Sampat Devgire

निफाड : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या (MVP) निवडणुकीचे (Election) मतदान रविवारी झाले. मतमोजणीची प्रक्रीया सुरु झाली आहे. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीच्या निकालाबात मोठी उत्सुकता आहे. यामध्ये निफाड (Niphad) तालुक्याचे मतदान निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे हा तालुकाच किंगमेकर ठरेल असे चित्र आहे. (MVP election voting process begen in the morning)

काल झालेल्या निवडणुकीत ९४.९० टक्के मतदान झाले. दहा हजार १९७ पैकी नऊ हजार ६७७ मतदान झाले होते. आज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात अतिशय कडक बंदोबस्तात मतमोजणी आज सकाळी आठला सुरु झाली.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (ता.२८) येथील होरायझन इंग्लिश मेडिअमच्या केंद्रावर २९०३ मतदारांपैकी २८०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदार असलेला निफाड तालुका किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे. हेविवेट नेत्यांच्या तालुक्याचा कौल संस्थेच्या प्रगतीला की परिवर्तनाला हे मतमोजणीत समजेल.

मविप्रसाठी सर्वाधिक मतदारांची संख्या निफाड तालुक्यात असल्याने सर्वाधिक १५ केंद्र निफाड येथे होते. सकाळी आठला मतदानाला सुरुवात झाली, येथील बुथवर जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळींची उपस्थिती होती हे विशेष. प्रगती पॅनलच्या उमेदवार नीलिमा पवार, माणिकराव बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, दिलीप मोरे, परिवर्तन पॅनलचे उमेदवार ॲड. नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षीरसागर, विश्वास मोरे, डी. बी. मोगल या उमेदवारांसह राजेंद्र मोगल, भास्कर बनकर आदी नेते व दोन्ही पॅनल समर्थक कार्यकर्ते मोठया संख्येने परिसरात उपस्थित होते. निफाड पिंपळगाव मार्गावर दोन्ही पॅनलच्या समर्थकांची गर्दी वाहने यामुळे मोठी वर्दळ असल्याने ट्राफिक जाम झाली होती. दुपारी दोनच्या दरम्यान पिंपळगाव निफाड रस्त्यावर दुतर्फा वाहनांची लांबच लांब रांगा लागल्याने दीड तास वाहतूक खोळंबा झाला होता. या मार्गाला जत्रेचे स्वरूप आले होते.

वयोवृद्ध व आजारी असलेल्या मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था, मविप्र रुग्णालयातील डॉक्टर्स, रूग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. निफाड हे सर्वाधिक मतदान असलेले केंद्र असल्याने संवेदनशील केंद्र असूनही शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली पडली. दरम्यान मतदान संपल्यानंतर होरायझन अकॅडमीच्या गेटवर प्रगती पॅनलच्या नेत्यांनी आभार मानत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

---------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT