<div class="paragraphs"><p>Nitesh Rane &amp; Gulabrao Patil</p></div>

Nitesh Rane & Gulabrao Patil

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंवर टीका करता, नितेश राणे आधी तुमची उंची पहा?

Sampat Devgire

जळगाव : हल्ली नितेश राणे (Nitesh Rane) उठतात अन् कोणावरही टीका करतात. टीका करताना आधी आपली राजकीय क्षमता तपासली पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्यावर टीका करावी एव्हढी नितेश राणे (Nitesh Rane) यांची उंची नक्कीच नाही, असे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटले आहे.

भाजपचे नितेश राणे यांनी नुकतेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला शविसेना नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यावर प्रतिक्रीया देताना राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला असे ते म्हटले होते. त्याचा श्री. आक्रमक गुलाबराव पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.

ते म्हणाले, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना राजकारणात आणले. त्यांनी संधी दिली त्यामुळे नारायण राणे मोठे झाले. ते मोठे झाले त्यात वैयक्तीक काहीच नव्हते तर शिवसेनेचे प्रतिनिधी व शिवसेना त्यांच्या मागे होती त्यामुळे ते मोठे झाले. उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांचे राजकीय वारसदार आहेत. त्यामुळे नितेश राणे यांनी टीका करताना इतरांवर जसे ते काहीही बोलतात, तसे शविसेना व उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलू नये. बोलताना विचारपूर्वक बोलावे, कारण मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करावी एव्हढी त्यांची उंची नक्कीच नाही.

श्री. पाटील म्हणाले, नारायण राणे यांना शिवसेनेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हा रामदास कदम यांना शिवसेनेने विरोधी पक्षनेता बनविले. यासंदर्भात श्री. राणे म्हणाले होते की, तेव्हा कदम आमच्यावर मनाला येईल तशी टीका करीत असत. आता रामदास कदम यांच्यासारख्या असंख्य शिवसेना कार्यकर्त्यांनी विचार करावा की, शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे त्यांचा वापर झाल्यावर अशा लोकांना वाऱ्यावर सोडतात. आज नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत, मात्र रामदास कदम कुठे आहेत? असा प्रश्न नितेश राणे यांनी केला होता. त्याचा गुलाबराव पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT