NCP corporator Jagdish Pawar
NCP corporator Jagdish Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नगरसेवकाची विनवणी...बिटको रुग्णालयच आजारी रुग्णांनी कुठे जावे!

Sampat Devgire

नाशिक : जुन्या बिटको (NMC) रुग्णालयातील समस्या कायमच्या सोडवून गरीब रुग्णांना दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी नगरसेवक जगदीश पवार (Jagdish Pawar) यांनी पालकमंत्री छगन भुजबळ, महापालिका आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांना दिले.

जगदीश पवार यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन जुन्या व नवीन बिटकोतील समस्या त्यांच्या निर्देशनास आणून आणल्या. त्यांनी तातडीने आयुक्त रमेश पवार यांना उपाययोजनांचे निर्देश दिले. आरती मांजलकर ही आठ महिन्यांची गरोदर महिला सोनोग्राफीसाठी बिटकोत आली असता, सोनोग्राफी मशिन बंद असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. भगवान आहिरे यांच्या नातीचे पोट दुखत होते. तिलाही सोनोग्राफीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले गेले, अशाच व्यथा रोज अनेक रुग्णांच्या वाट्याला येत आहेत.

बिटकोत लहान बाळांसाठी ऑक्सिजन नाही आणि ते देण्याची मशिनरी नाही. बिटकोत सोमवारी व गुरुवारी ओपीडी वरच्या मजल्यावर भरते. त्यामुळे गरोदर महिलांना त्रास होतो. फिजिशयन नसल्याने टीबी, बीपी, शुगर, गरोदर महिलांची तपासणी आदी साधे डॉक्टर करतात. तेच औषध देतात. गरोदर महिला व रुग्णांना सिव्हिलला पाठविले जाते. गरीब रुग्णांच्या जीवाशी रोज खेळ सुरू आहे. बिटकोतील ऑपरेशन थिएटरची दुरवस्था झाली आहे. त्यातील यंत्रणाही जुनी झाली आहे. आर्थोपेडीक, डेन्टिस्टचे साहित्य नसल्याने रुग्णांचे हाल होतात.

बिटकोत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची (सीएमओ) संख्या कमी आहे. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. बिटकोमध्ये महिनाभरापासून मोतीबिंदूसह डोळ्यांचे ऑपरेशन्स बंद आहेत. डोळ्यांचे ऑपरेशन होणार नाहीत, तुम्ही झाकीर हुसेन रुग्णालयात जा, असे रुग्णांना सांगितले जाते.

येथे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टर नाही. सोनोग्राफी मशिन आहे, तसेच ते चालविणारा रेडिओलॉजिस्ट नाही. या सर्व गोष्टींमुळे गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे आर्थिक फटका बसतो. बिटकोतील रक्तपेढीत रक्त नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे. अनेकदा बाहेरून रक्त मागवावे लागते. बिटकोतील सरकारी महालॅबचे रिपोर्ट वेळत येत नाहीत. बिटकोच्या स्वतःच्या लॅबमध्ये टेस्टिंग होत नाही. तिसरी कृष्णा लॅब सुरू आहे. तिन्ही लॅबच्या तीन तऱ्हांमुळे गरीब रुग्ण गोंधळून जात आहेत. नवीन एमआरआय मशिन ऑपरेटर नसल्याने तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून रिपोर्टस आणावे लागतात.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT