Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Simhasth Kumbh Mela politics: आधी ग्रुप टेंडर, आता थेट ‘इस्टिमेट’ दुप्पट करीत महापालिकेचा कोटींचा घोटाळा?

NMC road estimates fraud, Girish Mahajan doubt, NMC estimate enquiry ordered -मंत्री गिरीश महाजन यांसह महायुतीच्या नेत्यांना महापालिकेच्या दुप्पट दराच्या इस्टिमेटचा संशय, चौकशीचे आदेश!

Sampat Devgire

NMC Roads News: सिंहस्थ कुंभमेळ्याआधीच अनेक घोटाळ्याचे प्रकार चर्चेत आहेत. यामध्ये महायुतीतील राजकीय पक्षांमधील अंतर्गत संघर्ष कारणीभूत ठरतो आहे. महापालिकेवर नियंत्रण कोणाचे यातून एक नवा घोटाळा चर्चेत आला आहे.

नाशिक महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ९०० कोटींच्या कामाचे क्लब टेंडरिंग केले. यातून त्यांनी स्थानिक कंत्राटदाऱ्यांना स्पर्धेतून बाद केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी गंभीर आरोप केले होते.

हे आरोप चर्चेत असतानाच महापालिकेने केलेल्या रस्त्यांच्या कामांच्या अंदाजपत्रकांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाच संशय आला. त्यातूनच आता या कामांच्या निविदा निघण्याआधीच राज्य शासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संशय व्यक्त केल्याचा दावा सत्ताधारी पक्षाने केला आहे. महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी राज्य शासनाने रस्त्यांच्या कामाच्या अंदाजपत्रकांच्या तपासणीचे आदेशाला दुजोरा दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या रस्त्यांच्या कामातील आणखी एक झोल उघड होण्याची शक्यता आहे.

यंदाचा सिंहस्थ कुंभमेळा विविध कारणांनी चर्चेत आहेत. सिंहस्थाच्या विकास कामांसाठी निधी कुठून उपलब्ध होणार याविषयी विरोधकांकडून रान उठविले जात आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.

सिंहस्थ कुंभमेळा आणि विकास कामे हा सध्या महायुतीतील घटक पक्षांमध्येच वादाचा विषय आहे. नगर विकास विभागाला यातील अनेक विषयांपासून अंधारात ठेवण्याचा आरोप केला जातो. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक नाराज आहेत. शिवसेना शिंदे पक्षाचे महानगर प्रमुख बंटी तिदमे यांनी याबाबत तक्रार केली आहे.

रस्ते बांधणीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार सहा कोटी रुपये प्रति किलोमीटर असा दर आहे. नाशिक महापालिकेने मात्र अंदाजपत्रक थेट दुप्पट दराने केले आहे. दहा कोटीचा रस्ता १२ कोटीला असा हा कारभार आहे.

या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. दोन तास झालेल्या या बैठकीत दोन हजार कोटींच्या रस्त्यांच्या कामाची झाडाझडती घेण्यात आली. मात्र या चौकशीत सगळ्यांचेच हात दगडाखाली असल्याचाही दावा केला जातो.

महापालिकेत शिवसेना शिंदे पक्ष आणि भाजप दोघांकडूनही अधिकाऱ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न होत आहे. आता धार्यांमध्येच महापालिकेवर वर्चस्व कोणाचे यातून राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे महापालिकेच्या रस्त्यांच्या अंदाजपत्रकाची चौकशी ही अफवा की आणखी काही याची उत्सुकता चौकशीचा निकाल जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT