Jayant Patil, NCP
Jayant Patil, NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शेतकरी चिरडल्यानंतरही देशाच्या प्रमुखाला खेद ना खंत!

Sampat Devgire

साक्री : देशातील शेतकऱ्यांविरोधात इतकी मोठी कृती (So big action against farmers in Ciuntry) झाल्यानंतरदेखील देशाच्या प्रमुखांना ना खंत, ना खेद, ना दुःख होते. (No regret or grief even then after) यातून कोणती प्रवृत्ती देशात राज्य करते आहे, अभ्यासण्याची गरज असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री (Irrigation minister) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

देशात शेतकरी प्रश्नावर सरकारच्या विरोधात जी काही आंदोलने होत आहेत, ती चिरडण्याचा प्रयत्न केला जातोय. शेतकऱ्यांच्या मोर्चात पाठीमागून गाडी घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न होतोय, हे कृत्य करणारा मंत्र्यांचा मुलगा पाच-सहा दिवस सापडत नाही, सापडल्यानंतर त्याला पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीत ठेवले जाते.

येथील बाजार समिती आवारात मंगळवारी (ता. १२) झालेल्या धनगर, ठेलारी समाज मेळाव्याप्रसंगी मंत्री जयंत पाटील बोलत होते. मेळाव्यास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, की केंद्रीय तपास यंत्रणांचा बेसुमार वापर करण्यात येत आहे. या यंत्रणादेखील पातळी सोडून कारवाया करत आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या अधिकारी नव्हे तर बीजेपीचे नेते चालवत आहेत, असे वाटत असून, राज्यातील मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी हे धाडसत्र चालविले जात आहे. हल्ली दररोज टीव्हीवर धाडी टाकल्याच्या बातम्या दिसत आहेत, मात्र यातून काय निष्पन्न होते हे मात्र सांगितले जात नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी आतापर्यंत दहा वेळा धाड टाकली, मात्र आधीच्या धाडींमध्ये काय सापडले आणि आता काय आढळून आले याचा कुठलाही खुलासा केला जात नाही. हे केवळ सरकारमधील मंत्र्यांना व सरकारला बदनाम करण्यासाठीच केले जात असल्याचा आरोप मंत्री पाटील यांनी केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT