Uddhav Thackeray-Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Thackeray-Fadnavis Bhet : उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचे कडक भाष्य : ‘कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल’

Devendra Fadnavis Statement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी गुप्त भेट झाल्याच्या बातम्यांचा इन्कार केला. या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Vijaykumar Dudhale

Nashik, 25 April : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल मध्यरात्री वर्षा निवासस्थानी भेट झाल्याचा दावा ‘प्रबुद्ध भारत’ने केला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यावर आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी कडक शब्दांत भाष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मला भेटायचे असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करायची कोणतीही आवश्यकता नाही. आमची भेट अगदी उघडपणेही होऊ शकते. आमच्यामध्ये असे कोणतेही विषय नाहीत की, ते लपविण्याची आवश्यकता आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझी कुठलीही भेट घडलेली नाही. काही लोकं जाणीपूर्वक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देतात. खोटारड्या हॅंडलच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कथित भेटीच्या चर्चेने मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे उमेदवार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे या निवडणुकीसंदर्भात तर यांच्यात भेट झालेले नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीच्या संदर्भातील माहिती हे दोन्ही नेतेच देऊ शकतात. त्याबाबतची कोणतीही माहिती आम्हाला नाही, असे म्हटले आहे, त्यामुळे ठाकरे- फडणवीस भेटीचे गूढ वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT