Helmet compulsion in Nashik
Helmet compulsion in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

थांबा, शासकीय कार्यालयात जाताय? मग हेल्मेट घेऊन जा कारण...

Sampat Devgire

नाशिक : स्वातंत्र्यदिनापासून शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही अनेक जण हेल्मेट वापरत नसल्याने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सक्ती आणखी कडक केली आहे. त्यानुसार ६ नोव्हेंबरपासून शहरातील कुठल्याही शासकीय कार्यालयात विना हेल्मेट ‘नो एन्ट्री’ असणार आहे. तसेच वाद घातल्यास संबंधितावर चॅप्टर केस करण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्तांनी नाशिक शहरात स्वातंत्र्यदिनापासून शहरात हेल्मेटसक्तीचा नियम केला आहे. हेल्मेटशिवाय पेट्रोलपंपावर विना हेल्मेट दुचाकीस्वाराला पेट्रोल देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. पण त्याची अनेक ठिकाणी अंमलबजावणी होत नाही. उलट काही ठिकाणी पेट्रोल पंप चालकांशी वाद घालण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे आता हेल्मेट सक्तीचा निर्णय आणखी कडक करण्यात येणार आहे. यापुढे विनाहेल्मेट वाहनधारकांना पेट्रोलपंप परिसरात प्रतिबंध करण्यात येणार आहे. पेट्रोल पंपावर तसा ठळक फलक लावण्याचे आदेश आहेत.

कॉलेज, शासकीय कार्यालयात प्रवेशबंदी

विना हेल्मेट शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खासगी कोचिंग क्लास, पार्किंग, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, आदींसह शहरातील केंद्र व राज्य शासकीय कार्यालयात विना हेल्मेट प्रवेश नसणार आहे. पेट्रोलपंप चालकांना पंपावर सीसीटीव्ही लावण्याचा नियम सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेसह विविध शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयात विना हेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही. विना हेल्मेट शासकीय कार्यालयात प्रवेश केल्यास ८ दिवसांचा तुरुंगवास किंवा १२०० रुपये दंडाची शिक्षा केली जाणार आहे. विना हेल्‍मेट वाहनधारकाने वाद घातल्यास दुचाकीस्वाराविरोधात १९७३ फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, १०७ नुसार चॅप्टर केस केली जाणार आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT