Shivsena leaders with Students
Shivsena leaders with Students Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena; ‘लव्ह जिहाद’विरोधात शिवसेनेचाही एल्गार

Sampat Devgire

धुळे : शहरासह (Dhule) राज्यभरात लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत असून, या प्रकरणात अनेक तरुणी, महिलांना अन्याय अत्याचार, शारीरिक पिळवणूक यासह नरकयातनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाने (Uddhav Thackrey) लव्ह जिहादविरोधात एल्गार पुकारला आहे. (Uddhav Thackrey Shivsena take a awareness drive in Dhule)

येथील विविध महाविद्यालयांमध्ये भेटीगाठीतून कॉलेज तरुण-तरुणींच्या शिवसेनेचा ठाकरे गट प्रबोधन करत आहे. त्याबरोबरच समाजप्रबोधनपर पत्रकांचे वाटप केले जात आहे. श्रद्धा वालकर प्रकरण घडल्यानंतर राज्याच्या विविध शहरांमध्ये गेले काही दिवस त्यावर प्रतिक्रीया उमटत आहेत. यासंदर्भात हिदूत्ववादी संघटनांनी मोर्चे काढले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट देखील आक्रमक आहे. धुळे शहरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी युवकांमध्ये जनजागृती केली.

शिवसेनेच्या पत्रकात म्हटले आहे, की सोशल मीडियासारख्या माध्यमांद्वारे शाळा, महाविद्यालयांतील मुली-तरुणी तसेच इतर कारणांमुळे कुटुंबांपासून विभक्त झालेल्या महिलांना काही विशिष्ट व्यक्तींकडून लक्ष केले जात आहे. धर्म परिवर्तनासह शारीरिक छळ करण्यापर्यंत तसेच ठार करण्याच्या घटना घडत आहेत. यात १६ ते २० वर्षे वयोगटातील तरुणींना लक्ष्य केले जाते.

लव्ह जिहाद प्रकरणापासून स्वतःसह कुटुंबीयांना वाचविण्यासाठी कमलाबाई कनिष्ठ, जे. आर. सीटी, पालेशा, जयहिंद कनिष्ठ-वरिष्ठ, एसएसव्हीपीएस या महाविद्यालयातील प्रत्येक वर्गात माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या माध्यमातून समाजप्रबोधनपर पत्रकांचे वाटप झाले. लव्ह जिहादसारख्या प्रकारापासून विद्यार्थ्यांना दूर राहण्याचे आवाहन सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, किरण जोंधळे, भगवान करनकाळ, प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, धीरज पाटील, ललित माळी, राजेश पटवारी, देवीदास लोणारी, नितीन शिरसाट, प्रवीण साळवे, कैलास मराठे आदींनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT