OBC reservation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

OBC reservation : ओबीसींना पाडून मनोज जरांगेंचा जातीच्या वर्चस्वासाठी लढा; लक्ष्मण हाकेंनी सर्वच काढलं...

Laxman Hake meeting in Ahmednagar to maintain OBC reservation : ओबीसी आरक्षणासाठी लढा उभारणारे लक्ष्मण हाके यांनी नगरमध्ये ओबीसी समाजाची बैठक घेतली. मनोज जरांगे जातीचे वर्चस्वासाठी लढत असून यात ओबीसी आरक्षण संपवण्याचा राजकारण खेळले जात असल्याची टीका लक्ष्मण हाकेंनी केली.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : ओबीसी आरक्षण लढ्याचे नेते लक्ष्मण हाके यांनी अहमदनगरमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत मराठा आरक्षणासाठी लढा उभारलेले मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली.

"मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काम केलेले नाही. तसा समज करून देण्यात आला आहे. जरांगे यांनी केवळ ओबीसी उमेदवारांना पाडण्याचे काम केले. ते जातीच्या वर्चस्वासाठी काम करत आहेत. त्यांचा कायदा आणि संविधानाचा अभ्यास नाही. जे कधीच मिळणार नाही, त्यासाठी ते लढत आहे. लोकांना केवळ शिव्या देण्याचे काम करीत आहे", अशी टीका लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर केली.

लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण (OBC reservation) टिकवण्याची लढाई सुरू आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यासाठी आम्ही लढत आहोत. ओबीसीमध्ये शेकडो जातींचा समावेश आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवणे ही काळाची गरज आहे. इतर कोणाला आरक्षण लागत असेल, तर त्यांनी ते स्वतंत्र घ्यावे आणि मिळवावे. काहींचा ओबीसी आरक्षणावर डोळा आहे. यातून ओबीसी आरक्षण जाते की, काय अशी भीती वाटते. पण आम्ही तसे होऊ देणार नाही, असा खणखणीत इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. तसंच मनोज जरांगे यांच्या लढ्यावर देखील लक्ष्मण हाके यांनी जोरदार निशाणा साधला.

मनोज जरांगे (Maratha Reservation) यांची लढाई कायदा आणि संविधानाचा अभ्यास न करता सुरू आहे. जातीच्या वर्चस्वासाठी त्यांची लढाई सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी ओबीसींना पाडण्याचे काम केले. यातून त्यांची आगामी दिशा स्पष्ट दिसत असून सर्वांनीच सावध झाले पाहिजे. जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते, ते आज घडू लागले आहे. ओबीसी त्यांच्यासारखे उमेदवार उभे करणार नाही. मात्र जो पक्ष ओबीसींना जास्त जागा देईल, त्यांना मतदान केले जाईल. मनोज जरांगे यां पूर्णपणे राजकारण करायचे आहे. त्यांमुळे त्यांनी 288 मतदारसंघात उमेदवार द्यावेत, ताकद दाखवावी, असे आव्हान लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना दिले.

राजकारणी ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी गप्प

राज्यातील सर्वच राजकारणी आरक्षणाच्या मुद्यावर गप्प आहेत. वेळकाढूपणा करत आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून महाराष्ट्र जाती-जातीच्या राजकारणावरून जळत आहे. निवडणुका तोंडावर असताना आता एकत्र येण्याचे सल्ले दिले जात आहेत. विधानसभा निवडणूक लढतील, उरकून घेतील आणि फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील ओबीसींचे आरक्षण संपवून टाकतील. प्रथम ओबीसीला त्यानंतर एससी-एसटीला मतदान करू. राज्यातील कोणताही पक्ष ओबीसीला जास्त जागा देतील, त्यांना मतदान करण्याचे आमचे ठरल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

स्थानिक निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर

गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केवळ ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर टाकल्या आहेत. आताही विधानसभा झाल्यानंतर हे सरकार ओबीसींचे आरक्षण संपवून टाकणार आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी राहणार नाही. आम्ही ओबीसी हक्क व अधिकारासाठी लढत आहोत, असे देखील लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT