Angry crowd at Police station
Angry crowd at Police station Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पोलिस आयुक्तांच्या पुढाकाराने मध्यरात्रीचा तणाव निवळला!

Sampat Devgire

नाशिक : हजरत महम्मद पैगंबर यांच्याबाबत सोशल माध्यमावर (Social Media) अज्ञाताकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. मुस्लिम (Muslims) बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याने शेकडोंच्या संख्येने मुस्लिम बांधव भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल झाले. संशयितांवर कारवाईची मागणी केली. त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी (Police) तक्रार दाखल करून घेत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. (Tens in city after offensive post viral on social media)

आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे वृत्त शुक्रवारी मध्यरात्री पसरले. त्यावर जुने नाशिक, वडाळा रोड, तसेच वडाळा गाव परिसरातील नागरिकांत संताप निर्माण झाला. धार्मिक भावना दुखावल्याने मोठया संख्येने नागरिक भद्रकाली पोलिस ठाण्यात जमा झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी पोलिस ठाण्यात दाखल झाले.

या वेळी मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी करत संशयितांवर गुन्हा दाखल करत कडक कारवाई करण्याची मागणी केली. संशयितांविरुद्ध तक्रार दाखल करून घेत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शिवाय सायबर क्राईम विभागास देखील त्वरित कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वडाळा रोड, भारत नगर परिसरातील मुस्लिम बांधवांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल होत कारवाईची मागणी केली.

त्याचप्रमाणे वडाळा गावातील बांधवांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल होत कारवाईची मागणी केली. घडलेल्या घटनेमुळे जुने नाशिक परिसरासह मुस्लिमबहुल भागात तणावाचे वातावरण पसरले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी सर्वत्र अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पोलिस विभागाकडून योग्य ती कारवाई सुरू आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेत शांतता राखा.

- हिसामोद्दीन खतीब, शहर-ए-खातीब.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT