NCP leader Chhagan Bhujbal
NCP leader Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पक्षाने दिलेल्या पदाला नेत्यांनी न्याय दिला पाहिजे

Sampat Devgire

चांदवड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) या वयातही लोकविकासाची कामे अतिशय तत्परने करतात. त्यामुळे आपला नेता ज्या ताकदीने काम करतो त्याच ताकदीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देखील काम करून आपल्या पदाला न्याय द्यावा. स्थानिक स्वराज्य संस्था ते आमदार- खासदार पदापर्यंत आपल्या हक्काचे उमेदवार निवडून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

श्री. भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवड- देवळा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक येथील एनडीसीसी बँकेच्या सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, ग्रंथालय सेलचे अध्यक्ष विजय पवार, सेवादलाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अकबर शहा, देवळा तालुकाध्यक्ष यशवंत शिरसाठ, देवळा महिला तालुकाध्यक्षा उषा बच्छाव, महिला अध्यक्षा साधना भोकनळ, शहराध्यक्ष प्रकाश शेळके, देवळा शहराध्यक्ष दिलीप आहेर, युवक तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाकचौरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुजबळ पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, अर्थचक्र थांबले आहे. विकासकामांना अडथळा येत असला तरी विकासाची कामे मार्गी लावण्यास महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. चांदवड तालुक्यात निवडून आलेल्या सदस्यांना पक्षाने नेहमीच झुकते माप दिले असून, जास्तीत जास्त जनतेची कामे मार्गी लावावी, असे आवाहन त्यांनी सदस्यांना केले. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी गावागावात, घराघरात जाऊन जनजागृती करण्यात यावी. चांदवड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद असताना उमेदवार का निवडून येत नाही, याचे आत्मपरीक्षण येथील कार्यकर्त्यांनी करावे. तसेच, आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अधिक जोमाने कामे करून हक्काची माणसे निवडून देऊन त्यांच्याकडून लोकविकासाची कामे करून घ्यावी, असे आदेश उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. देवळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन उमेदवार निवडून आल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले.

माजी आमदार उत्तमबाबा भालेराव म्हणाले की, येवला तालुका ज्याप्रमाणे अवर्षणप्रवण क्षेत्राप्रमाणे आहे तसाच चांदवड तालुका आहे. त्यासाठी महामंडळ तयार व्हावे. मांजरपाडा प्रकल्पातील पाणी पुणेगावच्या माध्यमातून जलदगतीने जाण्यासाठी त्याची वहन क्षमता वाढविण्यासाठी पुणेगाव- दरसवाडी कालव्याच्या दुरुस्तीची कामे मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. गायकवाड यांनी महाविकास आघाडी सरकार असले तरी आगामी जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढविण्यात याव्या, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याच्या भावना ना. भुजबळांसमोर व्यक्त केल्या. विजय जाधव, दत्तात्रय वाघचौरे, प्रकाश शेळके, पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, उपसभापती शिवाजी सोनवणो, उत्तम आहेर, विजय गांगुर्डे, अरुण न्याहारकर, यशवंत शिरसाठ, रिजवान घासी, तुकाराम सोनवणे, डॉ. दिलीप शिंदे, अरुण न्याहारकर, नवनाथ आहेर, शहाजी भोकनळ, दिलीप आहेर, भूषण शेळके, अमोल खैरे, परशराम निकम यांन पक्षीय अडचणी मांडल्या.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT