Pratap Wadje
Pratap Wadje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ACB Action: चक्क शौचालयात घेतली दहा हजाराची लाच

Sampat Devgire

कळवण : अलिकडे जिल्ह्यासह (Nashik) राज्यात लाचखोरांवर धडक कारवाई केली जात आहे. लाचखोरीच्या सुरस कथा ऐकून आश्‍चर्याचा धक्काही बसत आहे. कोण कसे आणि कुठे लाच घेईल हे सांगता येत नाही. मात्र, कळवणच्या (Kalwan) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (Trible devolopment department) कार्यालयातील अधिकाऱ्याने चक्क शौचालयात लाच घेतल्याने सर्वांनीच तोंडात बोट घातले. (Trible department is in light due to ACB action)

कळवण आदिवासी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रामशाळेत रोजंदारीने सफाई कर्मचारी (चतुर्थश्रेणी) पदावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची स्वयंपाकी पदावर नियुक्ती करण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रताप नागनाथराव वडजे (वय ५४) याने ३० हजारांची मागणी केली होती. सोमवारी (ता. २९) दुपारी तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक सुनील कडासने, अपर अधिक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक वैशाली पाटील यांच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत चौकशी करून कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या अधिकाऱ्याच्या झाडाझडतीत मोठे घबाड सापडल्याची जोरदार चर्चा आहे.

चार दिवसात दुसरी कारवाई

नाशिकच्या आदिवासी विकास विभागात आठवड्याभरात दुसरा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.

गेल्या शुक्रवारीच आदिवासी विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश बागूल हे २८ लाख ८० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडले होते. या घटनेला चार दिवस होत नाही तोच पुन्हा याच खात्यातील कळवणच्या सहायक प्रकल्पाधिकाऱ्याला लाच घेताना सोमवारी (ता. २९) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडल्याने चर्चेला उधाण आले आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT