पिंपळगाव बसवंत : महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजपचे विरोधक सातत्याने प्राप्तिकर विभागाचे बळी ठरले आहेत. अनेक राजकीय नेत्यांवर या विभागाने छापे टाकरे आहेत. मात्र भाजपच्या एकाही नेत्याने नाव घेतलेले नसताना प्राप्तिकर विभागाचे नवे टार्गेट नाशिकचा कांदा ठरले आहे. येथील सहा ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापे (Income tax reids at six places) टाकल्याने खळबळ उडाली आहे.
सामान्यतः सध्याची केंद्रीय यंत्रणांची कार्यपद्धती विचारात घेता, आधी भाजपचे नेते एखाद्या राजकीय अथवा अन्य घटकांचे नाव घेतात आणि नंतर त्यावर कारवाई होते. मात्र आशिया खंडातील सर्वाधिक कांदा व्यापार होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर छापे पडले आहेत. सामान्यतः जेव्हा जेव्हा कांदा दर वाढतात तेव्हा केंद्र शासन निर्यात बंदी करते अथवा प्राप्तिकर विभाग व्यापाऱ्यांची तापसणी करतात.यंदा कांदा दर वाढले मात्र निर्यातबंदी न होता छापे पडले.
पिंपळगाव बसवंत शहरातील सहा कांदा व्यापाऱ्यांवर गुरुवारी आयकर विभागाने छापे टाकली. सकाळी सात वाजताच व्यापाऱ्यांच्या विविध आस्थापना कार्यालय, कांद्याचे गुदामे व निवासस्थानावर आयकर विभागाने धाड टाकली. कांदा व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर आल्याने पिंपळगाव शहरात एकच खळबळ उडाली असून इतर व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पिंपळगाव शहरात नामांकित कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने संक्रांत आणली. सकाळपासून गेली वर्षभरातील कांद्यासह जमीन खरेदीचे कागदपत्रे, बँकेतील व्यवहार यांची कसून चौकशी सुरू होती. चौकशीत काय आढळले हे मात्र गुलदस्त्यात आहे. पोलिस बंदोबस्तासह आयकर विभागाच्या सहा पथकाची कारवाई दिवसभर सुरू होती.
आयकर विभागाच्या छाप्यामुळे पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलावावर काहीसा परिणाम जाणवला. व्यापाऱ्यांनी या कारवाई धसका घेतला आहे. पिंपळगाव शहरातील नागरिकांमध्ये याबाबत चर्चा होती. पिंपळगाव बाजार समिती लगत असलेल्या चिचंखेडच्या भूखंडाची खरेदीचे कनेक्शनमुळे व्यापाऱ्यांवर हे धाडसत्र झाल्याचे बोलले जात आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.