Abdul Sattar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Abdul Sattar News : अब्दुल सत्तार यांचा इशारा ठरला निरूपयोगी!

Onion Traders allready submitted there license to APMC office-पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांना दिलेल्या इशाऱ्याचा काहीही उपयोग झाला नाही.

Sampat Devgire

Nashik farmers Politics : कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क रद्द करावे, यांसह विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पुकारला आहे. त्याबाबत अनेक प्रयत्न करूनदेखील हे लिलाव पूर्ववत सुरू झालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना राज्य व केंद्र सरकारला त्यावर काहीही तोडगा काढता आलेला नाही. (Onion auction is still not reopens in Nashik district APMCs)

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचा (Farmers) कांदा चाळीतच सडू लागला आहे. याबाबत पणनमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिलेला इशारादेखील निरूपयोगी ठरला आहे.

जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्याचा भाग म्हणून त्यांनी कांदा लिलाव बंद करण्यात आले आहेत. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच सडू लागला आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

राज्याचे पणनमंत्री सत्तार यांनी येवल्याच्या दौऱ्यात याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यांनी तत्काळ पणन संचालकांना सूचना देऊन व्यापाऱ्यांचे परवाने जमा करण्यास सांगितले होते.

सत्तार यांच्या या निर्णयाचा काहीही परिणाम होऊ शकला नाही. आंदोलन सुरू करतानाच व्यापाऱ्यांनी आपले परवाने बाजार समित्यांत जमा केले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत ५४२ व्यापारी आहेत. रोज सरासरी आठ कोटींची उलाढाल होते. त्याची सर्व झळ शेतकऱ्यांना बसली असून, त्याबाबत मंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकले नाहीत. त्यांचा इशारा निरूपयोगी ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT