Pachora Politics BJP Vs Shiv Sena Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Khandesh Politics : आमदार किशोर पाटील यांची विधानसभेची वाट बिकट; भाजपनेच दिलं थेट आव्हान

Sampat Devgire

BJP Vs shivsena: लोकसभेची निवडणूक संपताच जळगावमध्ये महायुतीत ठिणगी पडणार अशी परिस्थिती आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांना घरातूनच मोठे आव्हान आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांना आव्हान दिले आहे. अशातच महायुतीच्या नेत्यांनीही किशोर पाटील यांना चांगलेच घेरले आहे.

जळगाव लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र होते. भाजपच्या स्मिता वाघ (Smita wagh) मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाल्या. मात्र निकाल लागल्यावर महायुतीचे आमदार पाटील भाजपचे तालुकाप्रमुख अमोल शिंदे यांनी "लोकसभा तो झाकी है, आमदारकी अभी बाकी है" अशा सूचक घोषणा देऊन एकमेकांना हिणवले. यावरून विधानसभेत जळगावमध्ये काय चित्र असेल याची झलक दिसून आली.

निकाल लागल्यावर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आणि भाजपचे तालुकाप्रमुख अमोल शिंदे यांनी स्वतंत्रपणे विजय उत्सव साजरा केला. लगेचच भाजपचे शिंदे यांनी आमदार पाटील यांना आव्हान दिले. विविध आरोप करून आमदार पाटील यांना त्यांनी घेरले. त्यामुळे महायुतीला सुरुंग लागला आहे. यामध्ये आमदार पाटील चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या व भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी घरातूनच आव्हान दिले आहे. त्यामुळे आमदार पाटील राजकीय दृष्ट्या अडचणीत आहेत. अशावेळी महायुतीचे सहकारी म्हणून भाजपनेही त्यांना घेरले आहे. पाचोरा मतदासंघांत महायुती परस्परांचा हिशेब करण्यासाठी आतुर आहे.

येत्या निवडणुकीत आमदार पाटील यांना उमेदवारी मिळेल का? जागा वाटपात महायुती त्यांना सहज जागा सोडेल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महायुतीचा घटक असलेले भाजप नेते अमोल शिंदे हे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात, असे बोलले जाते, असे झाल्यास आमदार पाटील यांची विधानसभेची वाट बिकट झाल्याचे दिसू लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT