<div class="paragraphs"><p>Ajit Pawar at Jalgaon</p></div>

Ajit Pawar at Jalgaon

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

अजितदादांच्या स्वागतासाठी विश्रामगृहावर उडाली झुंबड

Sampat Devgire

जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांचे आज सकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अजितदादांच्या या दौऱ्याची मोठी उत्सुकता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची विश्रामगृहावर अक्षरश: झुंबड उडाली होती.

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर जयश्रीताई महाजन, आमदार अनिल पाटील, माजीमंत्री एकनाथराव खडसे, माजीमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनीही उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार हे आज जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आणि जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेणार असून जळगाव जिल्हा दूध संघाच्या नवीन दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर भुसावळ नगरपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पणही होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबत राजकीय क्षेत्रातही उत्सुकता आहे. विशेषतः पक्षाच्या कार्यकर्त्यांत मोठा उत्साह असल्याने विश्रामगृहावर त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकच वादा, अजित दादा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, रोहिनी खडसे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT