धुळे : ग्रामविकास, (Rural Devolopment minister) वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) धुळ्यात (Dhule) दोन दिवस मुक्काम ठोकतात. फोडाफोडीचे राजकारण (Politics) करतात. जिल्हा परिषदेचे (Zillha Parishad) अध्यक्ष, उपाध्यक्ष ठरवतात आणि निघून जातात. त्यांना जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांसह (Farmers suicide) इतर प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते (Leader of opposition) अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली. (Shivsena leader Ambadas danave visits dhule district)
श्री. दानवे जिल्हा दौऱ्यावर होते. शिरपूर, शिंदखेडा, वडणे (ता. धुळे) येथील दौऱ्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात वार्तालाप केला. यावेळी त्यांनी अशीच गत शिंदे- फडणवीस सरकारची असून, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी काही देणे- घेणे नसल्याची टिका केली.
ते म्हणाले, आदिवासींवर काही राजकीय लोकांची दादागिरी सुरू आहे. राज्यासह धुळे जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या घडल्या आहेत. त्या थांबविण्यात शिंदे- फडणवीस सरकारला रस दिसत नाही. अतिवृष्टी, वादळामुळे जिल्ह्यासह ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याऐवजी शिवसेनेवर (ठाकरे गट) गुन्हे दाखल करणे, सुडाचे राजकारण करणे, विकास कामांना स्थगिती देणे आदींमध्ये या सरकारला रस दिसतो.
त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. ते म्हणाले, राज्य सरकार सत्तेच्या धुंदीत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्यक्तीगत कामांमध्ये गर्क आहेत. त्यांना पिकांचे नुकसान, शेतकरी आत्महत्यांसह इतर ज्वलंत प्रश्नांवर विरोधकांशी चर्चा करायला वेळ नाही. त्यामुळे अशा सरकारला जागा दाखवून देण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी झोकून कामाला लागावे, असे श्री. दानवे म्हणाले.
शिरपूरला ग्रामस्थ संवाद
श्री. दानवे यांनी शनिवारी हिंगोणीपाडा (ता. शिरपूर) येथे आदिवासींसह शेतकऱ्यांशी संवाद साधला. स्वस्त धान्य वितरण, वनपट्टे, शेती, लम्पी चर्मरोग, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, पावसासह नुकसानीची स्थितीचा आढावा घेत त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. तहसीलदार आबा महाजन, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, उपसरपंच सुनीता पावरा, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू टेलर, युवा सेना विस्तारक प्रियंका जोशी, उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा, तालुकाप्रमुख अत्तरसिंह पावरा, विश्वनाथ पाटील, मुकेश शेवाळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील आदी उपस्थित होते.
गद्दारांना जागा दाखवा
श्री. दानवे यांनी शेतकरी हिताला महत्त्व न देणाऱ्या गद्दार सरकारला जागा दाखवा, असे आवाहन केले. राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, परंतु शंभर दिवसांत पाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
शिंदखेडा मतदारसंघात सामान्य मतदार परिवर्तन घडवू शकतो, असे श्री. दानवे म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून ५० हजाराच्या प्रोत्साहनपर अनुदानाचे नियमित कर्जफेडीतील शेतकऱ्यांना श्री. दानवे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप झाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी सतीश पाटील यांच्या कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले.
त्यांच्या दौऱ्यात संपर्कप्रमुख हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुंखे, माजी आमदार शरद पाटील, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, धीरज पाटील, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, विश्वनाथ पाटील, सर्जेराव पाटील, गिरीश देसले, विनायक पवार, गणेश परदेशी, चंद्रकांत ठाकूर, संतोष देसले, नंदकिशोर पाटील आदी उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.