People`s Agitation in Malegaon

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

मालेगावमध्ये नागरिकांनी केले भीक मांगो आंदोलन!

मालेगाव शहरात शनी मंदिर चौकात भीक मांगो आंदोलन करताना नागरिक.

Sampat Devgire

मालेगाव : शहरातील (Malegaon) बाजारपेठ तसेच प्रमुख भागातील रस्त्यांना खड्डे झाले आहेत. महापालिकेने एक महिन्यानंतरही दुरुस्त केले नाही. त्यामुळे सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेविरोधात गांधीगिरी करीत भीक मांगो आंदोलन केले.

आंदोलनकर्त्यांनी ‘दे दे... दे दे... कार्पोरेशन को खैरात दे दे..., कार्पोरेशन को भीक की जरुरत है..., आठाना, रुपया, चाराना कुछ भी दे दे...’ यासह विविध घोषणाबाजी करत आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी शनीचौक गटारीवरील स्लॅब तुटल्याने येथे अनेक नागरीक खड्ड्यात पडले. जखमी झाले. स्लॅबचा अंदाज न आल्याने दुचाकीचेही अपघात झाले. यातच सराफ पेठेत जाणाऱ्या दक्षिणमुखी मारुती मंदीराजवळ खांब तुटलेले आहेत. त्याचीही दुरुस्ती होत नाही. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्ड्यावर झेंडा लावून व दगड, विटा टाकून सामान्य नागरिकांना सावध करण्याचे काम केले. मात्र, स्लॅब टाकला गेला नाही. त्यामुळे आंदोलनाची वेळ आल्याचे समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी सांगितले.

भीक मांगो आंदोलनात श्री. बोरसे, मनोहर कासार, भरत पाटील, कमलेश बटेजा, रुपेश कासार, तेजस जैन, सागर श्रीवास्तव, रमेश मोरे, भिकू देसले, किशोर चौधरी, गोपाळ सोनवणे, सुनील पाटील, कैलास शर्मा आदी सहभागी झाले होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT