निफाड : (Niphad) होर्डिंग्जवर तब्बल ५० कोटी रूपये खर्च केले जातात. मात्र, शेतकऱ्यांना (Affected Farmers) साधी मदत देखील दिली नाही. पाठीवर चाळीस वार करणाऱ्या गद्दार सरकारला जनतेनेच धडा शिकवावा, असे आवाहन युवासेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी केले. (Eknath Shinde Government spend 50 Cr On advertisement but don`t have money for Farmers)
शिवसंवाद दौऱ्यात चांदोरी येथे झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. आगामी निवडणुकीत शिवसेना शंभर आमदार निवडून आणेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिंदे सरकारने महाराष्ट्रात राहून गुजरातला उद्योग दिले.दिल्लीत झुकणारे हे सरकार शेतकरी हिताचे नाही.तरुणांचा रोजगार हिरावला गेला.शंभर टक्के गुंतवणूक होणाऱ्या उद्योगांना गुजरातला पाठविले ही बाब निश्चितच मराठी माणसाशी केलेली प्रतारणा आहे.या सरकारला सामान्यांशी काहीही देणेघेणे नाही. अशा सरकारला पायउतार करण्यासाठी सज्ज रहावे,असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.
आयात- निर्यात धोरण चुकीचे
श्री. दानवे म्हणाले, बांगलादेशला द्राक्ष जातात. पण, मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट ड्युटी लावली जात आहे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान रडतखडत दिले. जिल्हा बँकेकडून यादी देऊनही ठराविक शेतकऱ्यांनाच अनुदान दिले. नुकसान भरपाई अजून दिलेली नाही. कांद्याच्या बाबतीतही आयात- निर्यात धोरण चुकीचे राबवत आहे.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले
माजी आमदार अनिल कदम म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जदाराचे दहा लाख रुपयांचे कर्ज सेटलमेंट करून दोन लाखात भरले जाते. मात्र, जिल्हा बँकेच्या कर्जदार सभासदांना कुठलाही दिलासा दिला जात नाही. सोसायट्यांना व्याजात सवलत दिली जात नाही. निफाड तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर असून, त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी असूनही ते पिकांना देणे शक्य होत नाही. दरम्यान, या वेळी असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार अनिल कदम, उपनेते सुनील बागुल, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे, आमदार नरेंद्र दराडे, गोकुळ गीते, माजी सरपंच संदीप टर्ले, नीलेश पाटील, सुधीर कराड, सुलभा पवार, दीपक शिरसाट, उत्तम गडाख व्यासपीठावर होते. सुहास सुरळीकर यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम रंधवे यांनी आभार मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.