Congress agitation at Malegaon
Congress agitation at Malegaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नरेंद्र मोदी यांनी महागाईच्या जाचाने जनतेला गॅसवर पोहोचवले!

Sampat Devgire

मालेगाव : केंद्र सरकारच्या (Centre Government) इंधन दरवाढीच्या (Fuel price hike) निषेधार्थ काँग्रेसने (Congress) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Dr Tushar Shewale) यांच्या नेतृत्वाखाली येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशान्वये आंदोलन करण्यात आले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील सात वर्षांच्या काळात महागाईने कळस गाठला आहे. महागाईमुळे सामान्य माणसांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस व खाद्यतेलाच्या किमती सामान्य नागरिकांच्या खरेदीच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. उज्ज्वल गॅसच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे.

श्री. शेवाळे यावेळी म्हणाले, गॅसचे दर हजारावर गेले आहेत. उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना महागडे सिलिंडर घेणे परवडत नाही. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल ७२ रुपये, एलपीजी सिलिंडर चारशे रुपयांना मिळत होते. मोदी शासनाने इंधन दरवाढ केल्यामुळे सार्वजनिक-प्रवास व मालवाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खाद्यतेल व इतर जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव वाढल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे.

सर्वच पातळ्यांवर केंद्र शासन अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, सतीश पगार, संजय पवार, एकनाथ कन्नोर, नीलेश थोरात, दत्तू खैरनार, गणेश देवरे, दत्तू वडक्ते, नितीन बच्छाव, संदीप ठाकरे, विजय शेवाळे, शशिकुमार पाटील, वसंत शेवाळे, उमेश शेवाळे, संदीप निकम व बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

इंधन दरवाढीमुळे जीवनावश्‍यकसह सर्वच वस्तूंच्या महागाईचा भडका उडाला आहे. जनतेच्या हाताला काम नाही. दुसरीकडे महागाईच्या भडक्यात सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंब भरडले जात आहे. सामान्य नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबतही केंद्र शासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे अकार्यक्षम केंद्र शासनाविरोधात भोंगा आंदोलन करण्यात आले.

- डॉ. तुषार शेवाळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

----

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT