Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पंतप्रधानांनी महागाई, बेरोजगारी विरोधातील युद्धही संपवावे!

Sampat Devgire

मुंबई : पंतप्रधान (PM Narendra Modi) परदेशात जाऊन युद्ध (War) संपवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ते देखील केले पाहिजे. ते युद्ध संपवल्यावर देशात परतल्यानंतर जनता जी महागाई, (Inflation) बेरोजगारीशी (Unemployment) युद्ध करीत आहे, त्यांचं ते युद्ध संपवाव ही आमची अपेक्षा आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना भोंग्यांच्या प्रश्नावर सुरु असलेले राजकारण तसेच त्यातून निर्माण होणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न याबाबत काय कारवाई करायची त्यात मुंबईचे पोलिस आयुक्त किंवा राज्याचे पोलिस प्रमुख यामध्ये लक्ष घालतील.

ते म्हणाले, आमचं सगळ्यांचं हेच म्हणने आहे, की राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महागाईचे प्रश्न आहेत. बेरोजगारीचे प्रश्न आहेत. आता नुकतेच कोरोनातून बाहेर पडल्याने निर्बंध शिथील केलेले आहेत. कोरोना पुन्हा चीनमधून येतो की काय अशी स्थिती आहे. या भितीची टांगती तलवार आहे.

ते पुढे म्हणाले, अशा वेळेला सर्वांनी एकोप्याने राहणे आवश्यक आहे. सर्व धर्म, जातींनी एकत्र येऊन या प्रश्नांवर मात करण्याची गरज आहे. हे सगळ्यांचेच मत आहे, तेच आमचेही मत आहे. धार्मिक तेढ निर्माण होईल असे वातावरण निर्माण करणे योग्य नाही. त्यामुळे यातुन धार्मिक तेढ वाढू नये, दंगलीची ठिणगी कुठे पडू नये या साठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. राज्य सरकार, पोलिस तर प्रयत्न करतीलच मात्र सर्व राजकीय पक्षांनी देखील ते केले पाहिजे.

पाकीस्तानात गडबड झाली. तीथे पंतप्रधानांना जावे लागले. इकडे श्रीलंकेत देखील अस्थिरता आहे. हीच परिस्थिती तिकडेही आहे. भारतातर्फे श्रीलंकेला काही मदत देण्याचे प्रयत्न झाले. अर्थात त्याबाबत आमच्या शेतकऱ्यांनी जे पिकवलं त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. अशी परिस्थिती जगामध्ये निर्माण होत असताना आपल्या देशात शांतता राखून, सगळ्यांना बरोबर घेऊन आपण आपल्या लोकांच संरक्षण केलं पाहिजे. अन्नधान्याचे, शिक्षणाच, महागाई या प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT